{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

आश्वी । झुंझार न्यूज

सिन्नर-शिर्डी महामार्गावर सावळीविहीर खुर्द परिसरात शुक्रवारी (३१ मे) दुपारी दोन वाजेच्या सुमारास एसटी बस आणि इर्टीगा कारचा अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात राहुरी तालुक्यातील निंभेरे येथील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य १० प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महेश काशिनाथ कांबळे आणि विशाल काशिनाथ कांबळे यांचा समावेश असून, या घटनेमुळे निंभेरे गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल आगाराची पनवेल-शिर्डी ही परिवहन महामंडळाची बस (क्र. एम एच १४ एल एक्स ८९५१) शिर्डीच्या दिशेने येत होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही बस सावळीविहीर खुर्द परिसरातील ब्रांच चारीजवळ आली असता, शिर्डीकडून सिन्नरकडे जाणाऱ्या इर्टीगा कारने (क्र. एम एच १७ डी जे ७८१८) बसला समोरासमोर जोरदार धडक दिली.


बस १०० फूट फरफटत गेली, कारचा चक्काचूर
धडक इतकी भीषण होती की, बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस सुमारे १०० फूट रस्त्याच्या खाली जाऊन कडेला असलेल्या एका बंद रसवंती मशीनला तोडून पुढे गेली. बसमधील प्रवाशांनी यावेळी एकच आक्रोश केला, तर एक महिला प्रवासी खिडकीतून बाहेर फेकली गेली. दुसरीकडे, इर्टीगा कारचा समोरून पूर्णपणे चक्काचूर झाला असून कारमधील इंजिनचा भाग आतपर्यंत घुसला होता.

कारमध्ये प्रवास करणारे महेश काशिनाथ कांबळे आणि विशाल काशिनाथ कांबळे (रा. निंभेरे, ता. राहुरी) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या भीषण अपघातात कारमधील अन्य प्रवासी प्रांजल ससाणे, सोहम ससाणे आणि प्रियंका ससाणे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांच्या पायाची हाडे फ्रॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.


या अपघातात बसमधील आणि कारमधील मिळून १० जण जखमी झाले आहेत. नागम्मा, कविता, ललिता, लक्ष्मी, अतर्क्य, ललिता गुंभनवार आणि श्रद्धा निते यांच्यासह इतर जखमींवर शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अपघाताची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद इंगळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.


या घटनेची माहिती मिळताच राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अक्षय कर्डिले यांनी दुःख व्यक्त करत कांबळे कुटुंबाचे सांत्वन केले आहे. ऐन दुपारी झालेल्या या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. निंभेरे येथील दोन तरुण भावांच्या अकाली निधनाने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *