झरेकाठी । झुंझार न्यूज

 

राज्यातील शैक्षणिक संस्थांसमोरील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक चर्चा आणि समन्वय साधण्यासाठी ‘महाराष्ट्र एज्युकेशन फोरम’ या व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे.

या फोरमची पहिली बैठक जलसंपदा मंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील व राज्यभरातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि संस्थाचालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीवर आपली मते मांडत अभ्यासपूर्ण सूचना आणि मार्गदर्शन केले.

बैठकीस महाराष्ट्र एज्युकेशन फोरमचे कार्याध्यक्ष श्री. राजेश पांडे, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती श्री. राजेंद्र विखे पाटील, नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेचे श्री. नितीन ठाकरे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री. संदीप कदम, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे श्री. समीर वाघ यांच्यासह राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शैक्षणिक संस्थांच्या विविध प्रश्नांबाबत एकत्रितपणे शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करणे, नवीन शैक्षणिक बदलांविषयी संस्थांमध्ये सुसंवाद निर्माण करणे, तसेच केजी ते पीजी आणि व्यावसायिक शिक्षण अधिक कौशल्याधारित व रोजगाराभिमुख करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *