काष्टी । झुंझार न्यूज


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात मारलेली भरारी कौतुकास्पद असून, त्यांच्या या यशाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. याच भावनेतून श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील ‘मा. श्री. बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्ट’ संचलित परिक्रमा पॉलिटेक्निक तर्फे एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या श्रीगोंदा, दौंड आणि शिरूर तालुक्यातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्याच शाळेत जाऊन सन्मान करण्यात आला.


परिक्रमा पॉलिटेक्निकच्या वतीने यंदा केवळ निकाल न पाहता, प्रत्यक्ष माध्यमिक शाळांमध्ये जाऊन तेथील पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबतच त्यांना घडवणाऱ्या संबंधित शाळांचे प्राचार्य आणि शिक्षकांचाही परिक्रमा परिवारातर्फे विशेष गौरव करण्यात आला.

या शाळांमधील विद्यार्थ्यांचा झाला गौरव


या उपक्रमांतर्गत तीनही तालुक्यातील अनेक नामांकित शाळांना भेटी देण्यात आल्या. यात प्रामुख्याने खालील शाळांतील गुणवंतांचा समावेश होता:

  • श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय, श्रीगोंदा: पूर्वा रणसिंग (९८.२०%), ज्ञानदा शेंडे (९७.६०%), संस्कृती गायकवाड (९७%).

  • खंडेश्वर माध्यमिक विद्यालय, येळपणे: प्रसाद कळमकर (९६%), वैष्णवी पठारे (९३.२०%), तन्वी धावडे (९३%).

  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय: देवयानी माने (९६%), सार्थक काळे व शृष्टी शेळके (९३%), आदित्य केंजळे (९२%).

  • R.R.P.F. दौंड स्कूल: निरू वाघजकर (९५%), अनुष्का टेकावड (९२.४०%), कृष्णा लगड (९०.८०%).

  • न्यू इंग्लिश स्कूल, मढेवडगाव: विशाल गोडसे (९४.८०%), उवेज तांबोळी (९३.६०%), कृष्णा मांडे (९३%).

  • श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, बेलवंडी: श्रेया जगताप (९४.८०%), सुरज घोडेकर (९३.८०%), तेजस्वी रायकर (९३.२% ).

  • फिरंगाई माध्यमिक विद्यालय, कुरकुंभ: सार्थक यादव (९४.४०%), समृद्धी साळुंके (९३.२०%), उदय जाधव (९२.४०%).

  • महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा: निशांत धोंडे (९४.४०%), आदित्य डेबरे (९३%), अभिजित चव्हाण (९२.८०%).

तसेच न्यू इंग्लिश स्कूल (जलालपूर), श्री गुप्तेश्वर विद्यालय (मोरेवस्ती), सिद्धेश्वर विद्यालय (देऊळगाव राजे), श्री वळणेश्वर विद्यालय (अजनूज), कौठा माध्यमिक विद्यालय, पद्मश्री आप्पासाहेब पवार विद्यालय (बाभूळसर), साईकृपा विद्यालय (टाकळी लोणार), भाऊसाहेब भागवत विद्यालय (लिंगाळी), जिजामाता भागवत विद्यालय (गोपाळवाडी), संगमेश्वर विद्यालय (सांगवी फाटा), जनता विद्यालय व कन्या विद्यालय (काष्टी) यांसह अनेक शाळांतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आणि परिक्रमा पॉलिटेक्निकच्या या उपक्रमाबद्दल परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक व माजी मंत्री श्री. बबनरावजी पाचपुते, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव तथा आमदार ॲड. विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते, अकॅडमी डायरेक्टर डॉ. सौ. इंद्रायणी पाचपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. अनिल पुंड आणि परिक्रमा पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ग्रामीण भागातील टॅलेंटला योग्य वेळी दाद मिळाल्याने पालकांनीही परिक्रमा संकुलाचे आभार मानले आहेत.