एप्रिल आणि मे २०२६ मध्ये अतिवृष्टी, पूर आणि वादळामुळे शेती पीकांच्या झालेल्या नूकसानीपोटी महायुती सरकारने जिल्ह्याला २१ कोटी ३०लाख रुपयांची मदत मंजूर केली असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे शेती पीकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले होते.जिल्ह्यातील सुमारे १२हजार ३४६.३९हेक्टर क्षेत्रावरील शेतीपीकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान होवून एकूण २१हजार ४९५ शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटात अर्थिक नूकसान सहन करावे लागले होते.
झालेल्या नूकसानीचे पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव तातडीने शासनास पाठविण्याच्या सूचना पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी महसूल व कृषी विभागास दिल्या होत्या.नूकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
राज्य सरकारने अहील्यानगर जिल्ह्यासह अन्य काही जिल्ह्यात झालेल्या शेतीपीकांच्या नूकसानसाठी मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे १०६कोटी ५६लाख ४८हजार रुपयांची मदत जाहीर केली असून अहील्यानगर जिल्ह्यात झालेल्या नूकसानीची भरपाई म्हणून २१कोटी ३०लाख रुपयांची मदत मंजूर झाली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील २१हजार ४९५ शेतकऱ्यांना मदतीचे अनुदान मंजूर करून महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे.यापुर्वी जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस वादळी वारे तसैच अन्य नैसर्गिक संकटात नूकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहीले होते.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,श्रीमती सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.