संगमनेर : झुंजार न्यूज                                                                                             माणसाला भौतिक प्रगती बरोबर संस्कारांची मोठी गरज आहे.कष्ट, प्रामाणिकपणा, निर्णय क्षमता, आत्मविश्वास आणि धडाडी देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत असून ही योजना म्हणजे सुसंस्कारित मनुष्यबळ घडवण्याची खरी जिवंत प्रयोगशाळा असल्याचे प्रतिपादन आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे एसएमबीटी डेंटल कॉलेज व आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या वतीने आयोजित  श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपसरपंच सिताराम गुळवे होते. तर व्यासपीठावर अनिल सोनवणे, गोरक्ष सोनवणे, सुनीता गपले ,सुरेश आरोटे, शरद भांड, रमेश बंड , प्राचार्य डॉ अशोक पाटील ,प्रशासकीय अधिकारी डॉ तूपसाखरे कार्यक्रमाधिकारी प्रा. पंकज जाधव आदी उपस्थित होते.या वेळी बोलताना प्रा. बाबा खरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्टीतून स्थापन केलेल्या एसएमबीटी डेंटल कॉलेजच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सेवाभावी काम केले जात आहे. गोरगरिबांच्या जीवनात आरोग्याची समृद्धी निर्माण करताना या महाविद्यालयाने सातत्याने सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आहे.राष्ट्रीय सेवा योजना ही सुसंस्कारित मनुष्यबळ घडवते. यातून सद्गुणांची चाड आणि दुर्गुणांची चीड निर्माण होऊन अभ्यासाची आवड व व्यायामाची निवड युवकांना करता आली पाहिजे.मोबाईलचा वापर कमी करून विद्यार्थ्यांनी पुस्तकाकडे  आकर्षित झाले पाहिजे. जग बदलते आहे,बदलत्या काळानुसार बदलणे ही गरज असली तरी संस्कार जपणे गरजेचे आहे.
परिश्रमाला पर्याय नसून आगामी काळात स्त्रि-पुरष समानता, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव , पान लोट क्षेत्र विकास, हरितगाव निर्माण करणे या विविध उपक्रमांमध्ये राष्ट्रीय योजनेच्या माध्यमातून तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ अशोक पाटील यांनी केले, सूत्रसंचालन प्रा पंकज जाधव यांनी तर समृद्धी चिखलीकर यांनी आभार मानले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *