संगमनेर । झुंझार न्यूज

 

ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करावी लागली. या परीक्षेला यंदा 4 लाख 28 हजारांहून अधिक उमेदवार बसणार होते. काही दिवसांपूर्वी NEET, CBSE मूल्यांकनातील गोंधळ, UGC-NET आणि विविध प्रवेश व भरती परीक्षांमधील अनियमितता यामुळे प्रत्येक वेळी लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया जातो आणि यामुळे येणारी उदासीनता आणि मानसिक नैराश्य तर वेगळंच ! हे सर्व या विभागातील भ्रष्टाचार असल्यामुळेच होत असल्याची टीका आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.

टीईटी परीक्षा पेपर फुटी बाबत बोलताना आ.सत्यजित तांबे म्हणाले की, TET ची केस थोडी वेगळी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सेवेत राहण्यासाठी नोकरी असलेल्याही सर्व शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे 20-30 वर्षे सेवा केलेले शिक्षकही जे आपल्या सेवापूर्तीच्या अंतिम टप्प्यात आहे .त्यांना सुद्धा आपली नोकरी वाचवण्यासाठी ही परीक्षा पास होणे अनिवार्य आहे. त्यामुळे  ही परीक्षा पास करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांच्या स्वप्नांवर एकप्रकारे घाला घालण्याचंच पापच या व्यवस्थेने केले आहे.


आता देशाला स्वातंत्र्य मिळून लवकरच जवळपास 80 वर्षे होतील. जग Artificial Intelligence आणि सायबर सुरक्षेच्या युगात पोहोचलं आहे. पण आपण अजूनही पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा व्यवस्था उभी करू शकलो नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? आजही आपण MPSC चे निकाल वेळेवर देऊ शकत नाही, परीक्षा कधी ऑनलाइन तर कधी ऑफलाइन घेतो.

 या सर्वच विषयांवर मी परवाच विधिमंडळात आवाज उठवत याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. खरंतर भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच ही व्यवस्था जाणीवपूर्वक सुधारली जात नाही. ही सिस्टीम सुधारूच नये, ही व्यवस्था पारदर्शक होऊच नये, अशीच काहींची मानसिकता आहे, हे माझं ठाम मत असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *