संगमनेर । झुंझार न्यूज
वारकरी सेवाभावी मंडळ व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात वारकरी मंच आणि जय हिंद युवा मंच संगमनेर संचालित श्री सोमेश्वर पायी दिंडी सोहळा रंगार गल्ली, संगमनेर ते श्री क्षेत्र पंढरपूर असे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती दिंडी मार्गदर्शक ह भ प कल्याण महाराज पवार यांनी दिली आहे.

याबाबत पुढे माहिती देताना ते म्हणाले की, संगमनेर तालुका हा सुसंस्कृत आणि धार्मिक विचारांचा तालुका आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे सौ दुर्गाताई तांबे डॉ जयश्रीताई थोरात व नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद युवा मंचच्या वतीने हीच आध्यात्मिक परंपरा जपत वारकरी सेवाभावी मंडळ व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात वारकरी मंच आणि सोमेश्वर पायी दिंडी सोहळा, संगमनेर येथून श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
ही दिंडी बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी नियोजित ठिकाणाहून मार्गस्थ होणार आहे. त्याचप्रमाणे रविवार दिनांक 26 जुलै 2026 पर्यंत ही दिंडी असणार आहे.
दिंडीचा शेवटचा विश्राम हा तिरंगा नगर वखारी रोड (शोभाताई सावकारे यांचे निवासस्थान) पंढरपूर येथे होणार आहे.

तरी या पायी दिंडीत तालुक्यातील , विविध गावातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने दिंडी आयोजक ह भ प दादाजी महाराज शिल्लक , ह भ प कल्याण पवार, ह भ प जालिंदर ढोकरट यांच्यावतीने करण्यात आले आहे.

