{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

 

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा रस्त्यात अडवून विनयभंग करण्यात आल्याची घटना काल संध्याकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, याच्या निषेधार्थ तुळापूर आणि निंभेरे या दोन गावांनी कडकडीत बंद पाळला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी काल संध्याकाळी आपल्या कामावरून जात असताना, आरोपी आरमान जब्बार शेख याने तिला रस्त्यात अडवले आणि तिचा विनयभंग केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरली होती. तिने तातडीने घरी जाऊन पालकांना हा सर्व प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या मांडला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी जमावाला शांत करत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले.

पालकांच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी आरमान जब्बार शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास चक्रावून फिरवत आरोपी आरमान शेख याला ताब्यात घेतले आहे.

या घटनेचा निषेध म्हणून गुरुवारी सकाळी तुळापूर व निंभेरे गावातील ग्रामस्थांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. यावेळी आयोजित निषेध सभेत विविध मान्यवरांनी महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याची भावना व्यक्त केली.

याप्रसंगी ह.भ.प. मनोहर महाराज सिनारे, माजी सभापती भीमराज हारदे, तुळापूरचे सरपंच दादासाहेब हारदे, अमोल हारदे, निंभेरीचे सरपंच शांताराम सिनारे, ह.भ.प. आकाश महाराज हारदे, शरद विधाते, कामगार पोलीस पाटील बाळकृष्ण हारदे, सेक्रेटरी माधव हारदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी या निमत्ताने जोर धरत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असले तरी, पोलिसांनी आरोपीला अटक केल्याने ग्रामस्थांनी काहीसा दिलासा व्यक्त केला आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *