राहुरी तालुक्यातील सात्रळ पंचक्रोशीतील शेतकरी बांधव, वीजग्राहक व नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत अनियमितता व सुरळीत होत नसून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा करत महावितरण च्या सात्रळ सबस्टेशन च्या आवारात सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते , धरणे धरो आंदोलन चालू केले आहे.मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचे सांगितले.
आंदोलक शेतकरी तसेच ग्रामस्थानी केलेल्या मागण्याचे निवेदन महावितरण च्या डेप्युटी इंजिनियर किशोर पाटील तसेच सब स्टेशन चे सब इंजिनियर दिलीप गाढे यांना दिले आहे. निवेदनात सात्रळ सबस्टेशनला तात्काळ पूर्णवेळ अभियंता नियुक्त करावा, शेतीसाठी सलग 8 तास दर्जेदार वीजपुरवठा द्यावा, सात्रळ सबस्टेशनचे कार्यालय गावात स्थलांतरित करावे, आठवड्यातून एकदाच नियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा खंडित करावा; त्याच कारणासाठी वारंवार वीजपुरवठा बंद करू नये,सर्व भागात पूर्ण दाबानेवीजपुरवठा करावा,शेतीसाठी 8 तास वीज मिळत नसेल तर यापुढे पंचक्रोशीतील ग्रामस्थ घरगुती लाईट बिल भरणार नाही यासाठी महावितरणला कुठलेही सहकार्य ग्रामस्थ करणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. अंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या महावितरण च्या अधिकाऱ्यांकडून समर्पक तसेच ठोस उत्तरे न मिळाल्याने आंदोलन चालूच राहणार असल्याचे समजते.
या आंदोलनात किरण कडू पाटील, बलराज पाटील, बाळासाहेब डुकरे, अमोल दिघे,अवधूत चोरमुंगे,परशराम साबळे, नंदू कडू, बापू दिघे,संभाजी कडू,हर्षल कडू,संजय निधाने, सागर डुकरे, कैलास पडघलमल, अण्णा अनाप,योगेश पडघलमल, दत्तू पडघलमल,बाळासाहेब डुक्रे,संदीप डुक्रे,माऊली अनाप,निखिल डुक्रे, हरिभाऊ सिनारे ,किरण अंत्रे तसेच परिसरातील सर्व पक्ष कार्यकर्ते व अनेक संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.