संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांचे 21 दिवसांपासून दिल्लीमध्ये आमरण उपोषण सुरू होते. या आमरण उपोषणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून उलट आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी हल्ला करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वा. संगमनेर बस स्थानक येथे भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणी करता देशभरातील हजारो विद्यार्थ्यांचे मागील 21 दिवसांपासून जंतर-मंतर या ऐतिहासिक मैदानावर आंदोलन सुरू होते. 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने संसदेकडे प्रस्थान केले मात्र केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांवर अत्यंत अमानुषपणे लाठी हल्ला केला.

यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. अगदी इंग्रज सुद्धा असे वागत नव्हते अशा प्रकारचे अमानवी कृत्य केंद्र सरकारने केले आहे. जगभरात या हल्ल्याचे तीव्र पडसाद उघडले असून महाराष्ट्र व देशभरात ठिकठिकाणी तीव्र निदर्शन होत आहे.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या हल्ल्याची तीव्र निंदा करताना देशातील लोकशाहीच्या इतिहासातील वाईट घटना अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या अमानुष लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी समविचारी प्रवाह संगमनेर यांच्या वतीने बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता संगमनेर बस स्थानक येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य मशाल मोर्चा आयोजित केला आहे.

तरी या मशाल मोर्चामध्ये सर्व समविचारी पक्षांनी युवकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *