{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

सोनम वांगचुक हे देशातील आदर्श व्यक्तिमत्व आहे .त्यांचे 21 दिवसांपासून दिल्लीमध्ये उपोषण सुरू आहे. त्यांचे उपोषण हा विद्यार्थ्यांचा व सर्वसामान्यांचा आवाज आहे. हा आवाज सरकारला ऐकू येत नाही हे दुर्दैव आहे. सत्तेचा दर्प केंद्र सरकारच्या वागण्यात दिसत असून हा उद्रेक सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे सांगताना जंतर-मंतर वरील विद्यार्थ्यांवरील हल्ला ही भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल व शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सोनम वांगचुक हे शिक्षण क्षेत्रातील देशातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आदर्शवत व्यक्तिमत्व आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांचे जंतरमंतरवर 21 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. खरे तर सरकारने त्यांच्याशी समन्वय साधायला पाहिजे होता. मात्र 21 दिवसांपासून सरकारचा एक प्रतिनिधी सुद्धा त्यांच्याशी बोलला नाही हे अत्यंत चुकीचे आहे. हा आवाज विद्यार्थ्यांचा ,सर्वसामान्य युवकांचा आणि ज्या विद्यार्थ्यांनी नीट चा अभ्यास करण्यासाठी मोठे कष्ट घेतले त्यांच्या कुटुंबीयांचा आहे.

विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. आणि अचानक पेपर फुटी मुळे पेपर रद्द होतो काय अवस्था त्या विद्यार्थ्यांची होते. त्यांच्या प्रति थोडी सुद्धा संवेदना सरकारने दाखवली नाही. सत्तेचा दर्प केंद्र सरकारला आला असून कुणी काहीही करा आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही निवडून येतो. असा त्यांचा समज आहे. निवडणुकीमध्ये ते निरनिराळे फंडे वापरतात. पण देशातील तरुणाईचा हा उद्रेक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये झालेल्या आंदोलनामध्ये इंग्रजांनी सुद्धा स्वातंत्र्यसैनिकाशी वेळोवेळी संवाद साधला. सोनम वांगचुक यांचे वडील यांनी जेव्हा लडाख मध्ये उपोषण केले. तेव्हा पंतप्रधानपदी असलेल्या इंदिराची गांधी यांनी स्वतः जाऊन त्यांचे उपोषण सोडवले. मात्र सध्याच्या सरकारला जनतेचे काही घेणे देणे नाही. त्यांनी जनतेला गृहीत धरले आहे.

सध्या संपूर्ण देशांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. सर्वच अनागोंदी वाढली आहे. काँग्रेस पक्ष हा लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहे. आता जनतेने सुद्धा यामध्ये सहभागी झाले पाहिजे.

काँग्रेसने संसदेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला. खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. नीटच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ते देशभर जागृती करत आहेत. प्रचंड प्रयत्न त्यांचे सुरू आहे.

देशामधील लोकशाही आणि राज्यघटना जपण्यासाठी सध्या जनतेने पुढे आले पाहिजे. देशात व राज्यात सुरू असलेल्या अनागोंदीची दुरुस्ती दुरु करण्याची जबाबदारी जनतेची आहे.

याचबरोबर राज्यामध्ये मतदार पूर्णनिरीक्षण अभियान सुरू आहे. मतदारयादी हा लोकशाहीचा पाया असून सर्वांचे नाव मतदार यादीत आले पाहिजे यामध्ये कोणीही चुकीचे काम करू नये असे ही त्यांनी म्हटले आहे.

सोनम वांगचुक हे मोठे शिक्षण तज्ञ पर्यावरणवादी नेते आहेत. मागील सहा महिन्यापूर्वी माजी शिक्षण मंत्री तथा बेस्ट ऑफ फाईव्ह चे जनक लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी लडाख येथे जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली व सध्याची देशातील राज्यातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण व्यवस्थेबाबत त्यांनी चर्चा केली. सोनम वांगचुक रॅमन मॅगसेस पुरस्कार विजेते असून त्यांनी हिमालयातील जलसंधारणावर मोठे काम केले आहे. त्यांच्या उपोषणानंतर काल दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र निषेध केला असून संगमनेर तालुक्यातील काँग्रेस सह सर्व पुरोगामी संघटना व सर्व विद्यार्थी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *