लोणी : झुंजार न्यूज एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी (पक्ष) च्या वतीने महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांना आदिवाशीच्या गायरान अतिक्रमामधून काढू नये , वन विभागातील जमिनी कायम कराव्या तर मत्स पालन व उदयोगांचे टेंडर आदिवाशीनाचं मिळावे आदीसह विविध असणाऱ्या प्रश्ना संदर्भात निवेदन देण्यात आले .
संस्थापक अध्यक्ष रेवननाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी (पक्ष) च्या पदाधिकारी व आदिवाशी कार्यकर्त्यानी १) आदिवाशी समाज्याकरिता स्वतंत्र असे सहा हजार कोटीचे बजेंट करावे , २) गायरान अतिक्रमण संदर्भात न्यायालयाने काढण्याचे आदेश दिले मात्र सरकारने मध्यस्थीची भूमिका घेवून आदिवाश्यासह बहुजनाना काढू नये . ३) भिल्ल समाजाची भटकंती मुळे गावाकुंसाला वस्ती असते त्या वस्तीस स्वतंत्र असा ग्रामपचायत दर्जा द्यावा . ४) भिल्ल समाज्यास पेसा कायदा , वन हक्क कायदा , गाव जमिन व ग्रामपचायतीत सहभाग करण्याचे आदेश द्यावे . ५) भिल्ल समाज्याचा मच्छीमार हा पारंपारीक व्यवसाय असून मोठया उदयोगात या समाज्याला टेंडर मिळावे अशा विविध प्रश्ना बाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली
आदिवाशी समाज्याकरिता सरकारकडून कल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्याच्या या मागणीवर विचार पुर्वक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रेवननाथ जाधव व पदाधिकाऱ्यांना दिले .

यावेळी राष्ट्रीय महासचिव डॉ. राहुल आहिरे , कमिटी अध्यक्ष देविदास चौधरी , महाराष्ट्र राज्य संपर्क अध्यक्ष तुषार आहिरे , दक्षिण महाराष्ट्र अध्यक्ष माधव भांगरे, नाशिक जिल्हा अध्यक्ष अशोक नाईक, नाशिक जिल्हा संघटक चंद्रशेखर रोकडे, सिन्नर तालुक्यातील माजी सभापती सौ. सुमन बर्डे तसेच नाशिक जिल्हा महिला शाखा पदाधिकारी, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद आदि.. उपस्थित होते .

