संगमनेर : झुंजार न्यूज                                      गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, या हेतूने राज्य सरकारने यावर्षी दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा दिला. काही ठिकाणी तो वेळेवर मिळाला. पण, काही ठिकाणी तो उशिरा मिळाला. आता गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा देणार असल्याची घोषणा केली. परंतु गुढीपाडवा झाला तरीही अहमदनगर जिल्ह्यामधील एकाही गोडाऊनमध्ये आनंदाचा शिधाच पोहचला नाही. त्यामुळे दुकानात शिधावाटप झालेचं नाही. आनंदा शिधाविनाचं गुढी पाडवा गोर गरिबांनी साजरा केला .

आनंदाचा शिधा घेण्यासाठी मोठ्या आशेने आलेल्या गोरगरीब कुटुंबांच्या निराश होऊन वापस जावं लागले आहे. गुढी पाडव्याच्या दिवसी सकाळपासूनच गावा – गावातील , शहरातील रेशन दुकानांमध्ये आनंदाचा शिधा घेण्यासाठी गोरगरीब ग्राहकांनी गर्दी केली होती. परंतु दुकानात शिधाच आला नसल्याने ग्राहकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.

सरकारला शिधा द्यायचा होता तर मग गुढीपाडव्याच्या पूर्वी का दिला नाही, असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक गोडाऊन आहे. या एकाही गोडाऊनमध्ये आनंदाचा शिधा पोहोचला नाही. जिल्ह्यातील लाखों कुटुंब शिधापासून तुर्तास वंचित राहिले .

गुढीपाडव्यानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. पण सरकारी संपाचा परिणाम या शिधा वाटपावर झाला. गेली आठवडाभर सरकारी कर्मचारी संपावर होते. याचा परिणाम शिधा वाटपाला आता उशीर होणार आहे. आता गुढीपाडवा झाला, तरी अद्याप शिधा पोहचलेला नाही.

आनंदाच्या शिधावाटपाला उशीर होणार आहे. सर्वसामान्यांचा गुढीपाडवा गोड व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून शिधा वाटप केले जाणार होते. पण,  शिधा पोहचला नाही. त्यामुळे त्यांचा गुढीपाडवा हा गोड झालाचं नाही.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed