लोणी बुद्रुक येथील ताराबाई भाऊराव विखे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७९ होते.
कै. ताराबाई विखे या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन स्वर्गीय संपतराव बापूनाना कडू पाटील यांच्या भगिनी तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चुलती तर लोणी ग्रामपंचायतीचे सदस्य प्रवीण विखे व सचिन विखे यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने विखे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, लोणी बुद्रुक, प्रवरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.