झरेकाठी । झुंझार न्यूज

 

राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील ज्येष्ठ नागरिक कै. भाऊसाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांचे रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ८.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, तीन मुलं ,दोन मुली, सुना नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने विखे पाटील कुटुंबीयांसह लोणी परिसरात शोककळा पसरली आहे.

कै. भाऊसाहेब विखे पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता लोणी बुद्रुक येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कै. भाऊसाहेब विखे पाटील हे विक्रांत भाऊसाहेब विखे पाटील, विक्रम भाऊसाहेब विखे पाटील आणि विजय भाऊसाहेब विखे पाटील यांचे वडील होते.

तसेच अशोक एकनाथराव विखे पाटील, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील आणि राजेंद्र एकनाथराव विखे पाटील यांचे ते चुलते होते. तसेच एकनाथराव चंद्रभान घोगरे पाटील आणि सुरेशराव गेणूजी कोल्हे पाटील यांचे ते सासरे होते.

त्यांच्या निधनाने विखे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक, आप्तेष्ट व परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *