{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

नाशिक-पुणे महामार्गावरून संगमनेरच्या दिशेने टाटा नेक्सॉन कारमधून अवैध गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी साईखिंडी फाटा येथे कारवाई केली.

या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल *१५२.६१ किलो गांजा* जप्त करण्यात आला. जप्त गांजाची किंमत *७६ लाख ३० हजार ५०० रुपये* असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन कार अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. गांजासह वाहन व इतर मुद्देमाल असा एकूण *८८ लाख ७७ हजार ४७० रुपयांचा* मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक *८१९/२०२६* नुसार एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गांजा पुरविणारा आणि गांजा विक्रीसाठी घेणाऱ्या व्यक्तींसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा नेमका कुठून आणण्यात आला आणि तो कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होता, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *