आयपीएल 2023 च्या आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. 16 व्या हंगामातील 31 वा सामना आज, 22 एप्रिलला मुंबईच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 31 व्या सामन्यात शनिवारी, 22 एप्रिलला पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना सामना पंजाब किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे तर, पंजाब सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात हैदराबाद संघाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. तसेच पंजाब किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभवानंतर आज मुंबई विरुद्ध मैदानात उतरणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग मध्ये मुंबई आणि पंजाब या संघांमध्ये आतापर्यंत 29 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड किंचित जड दिसून आलं आहे. मुंबई इंडियन्स संघाने 29 पैकी 15 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सने 14 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई आणि पंजाब या दोन संघामध्ये 22 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईतील नावखेडे स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होणार
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग ‘जिओ सिनेमा’ ॲपवर उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील
