आश्वी | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील प्रवरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी (SSC)च्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत विद्यालयाचा निकाल- 100 % लागला आहे .

विद्यालयातील प्रथम क्रमांक शेख तमन्ना लालमहमंद -84 % तर द्वितीय क्रमांक चव्हाण साक्षी जालिंदर – 82 . 60 % . तृतीय क्रमांक मुन्तोडे तृप्ती विजय – 78 . 20 % यांनी मिळविला असून यंदाच्या निकालात मुली सर्रस दिसत आहे .

यशस्वी विदयार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आण्णासाहेब म्हस्के , माजी पचायत समिती सदस्य तबाजी मुन्तोडे , जेहूरभाई शेख , उपसंरपच सुनिल मुन्तोडे , दिपक रक्टे , विजय मुन्तोडे , राजेंद्र नागरे , भिमाजी बोंद्रे मुख्याध्यपक एस पी कडलग तसेच स्थानिक स्कूल कमिटी सर्व सदस्य . शालेय व्यवस्थापन समिती व शालेय व्यवस्थापन व विकास समिती सर्व सदस्य,शिक्षक व पालक संघ व माता व पालक संघातील सर्व सदस्य व सर्व ग्रामस्थ यांनी सर्व यशस्वी विदयार्थी व शिक्षक यांनी अभिनंदन केले .
