कोपरगांव : झुंजार न्यूज

   कोपरगांव तालुक्यातील शिंगणापुर येथील संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कुल दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असुन कुमारी अश्विनी गोरखनाथ म्हस्के (९५ टक्के प्रथम), पवन राहूल रोठे (९२.६० द्वितीय) तर कुमारी अमृता प्रमोद लोखंडे (९१.५० तृतीय) क्रमांकाने उत्तीर्ण झाले असुन सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
 संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या सौ. रेणुका विवेक कोल्हे म्हणाल्या की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी विद्यालयाची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. शालांत प्रमाणपत्र परिक्षेत शंभर टक्के निकालाची वर्षानुवर्षे परंपरा याही वर्षी विद्यालयानेे कायम टिकवली आहे. दहावी परिक्षेत ४० विद्यार्थी विशेष प्राविण्य, २६ प्रथम श्रेणीत तर ७ द्वितीय श्रेणीत अशा सर्व ७३ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत शंभर टक्के यश पटकावले आहे. बालवाडी पासुन ते दहावी पर्यंत मुला-मुलींची विशेष तयारी येथे करून घेतली जाते,. वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते, शाळेच्या संपूर्ण परिसर सुसज्ज मैदानासह नैसर्गिक वातावरणाने परिपूर्ण आहे, शिवाय तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूलचा विशेष दबदबा राहिलेला आहे. तरी जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मोहसीन शेख, शैक्षणिक मुुुख्य समन्वयक हरिभाऊ नळे, बाळासाहेब जाधव, व सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्वोत्कृष्ट निकालाबद्दल संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्व थरातून स्वागत होत आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *