संगमनेर : झुंजार न्यूज
अमृतवाहिनी शेती शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनियर कॉलेज इयत्ता दहावीच्या निकालाची उत्कृष्ट परंपरा यंदाही कायम राहिली आहे. यावर्षी दहावीचा १०० % निकाल लागला. अशी माहिती प्राचार्या श्रीमती शीतल गायकवाड यांनी दिली आहे.

मार्च २०२३ च्या एस एस.सी. परिक्षेस एकूण १०७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी उच्च श्रेणी ( Distinction ) मध्ये ५७ विद्यार्थी, प्रथम श्रेणी ३२, द्वितीय श्रेणी मध्ये १५ तर तृतीय श्रेणीमध्ये ०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रथम क्रमांक आश्लेषा उज्जवल राणा (९५.६०%), द्वितीय क्रमांक गिताली राजेश रत्नाकर (९३.८०%), तृतीय क्रमांक यशदा योगेश मनाठकर (९३.२०%) अशी विदयालयातील सुयश मिळविणा-या विद्यार्थ्यांचे नावे आहेत.

सदर विद्यार्थ्याचे अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ पाटील, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयुताई देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, प्राचार्या श्रीमती. शितल गायकवाड यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

