पुणे : झुंजार न्युज
परीक्षेपर्यंत पोहोचणाऱ्या मुलींचे प्रमाण अजूनही मुलग्यांपेक्षा कमी आहे, हा याचा अर्थ. मुले आणि मुली यांचे प्रमाण समान किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला हवे. ज्या मुली दहावीच्या आत शाळा सोडतात, त्याची कारणे शोधून ती दूर करायला हवीत. दहावीत मुलींचे उत्तीर्णांचे प्रमाण अधिक असल्याने मुलींचे दहावीनंतर शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होते असा अनुभव आहे. या मुलींचे उच्च शिक्षण पूर्ण होईल, असे सामाजिक वातावरण खेड्या-पाड्यांत आणि समाजाच्या सर्व घटकांत तयार होईल, हेही पहायला हवे. राज्यातील नऊ विभागांत कोकण विभागातील उत्तीर्णांचे प्रमाण अधिक असण्याचा कलही जुना आहे. यंदाही कोकण विभागातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ९८.९१ टक्के आहे.
उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी किंवा विशेष प्रावीण्य श्रेणी मिळाली. ४.८९ लाख विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण आहेत, तर ५.२६ लाख विद्यार्थ्यांना ६० ते ७५ टक्क्यांच्या घरात गुण मिळाले आहेत. भरपूर गुण मिळविण्याचे हे सार्वत्रीकरण स्वागतार्ह आहे. दहावीच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप ठरलेले असते आणि प्रश्नांची उत्तरे साचेबद्ध असतात. ही उत्तरे लिहिण्याचा जितका सराव अधिक तितके गुण अधिक असे समीकरण आहे; ते समजून अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढते आहे, हा याचा अर्थ. दहावीतील गुणांची उपयुक्तता अकरावी प्रवेशासाठी अधिक असते, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हायला हवी. पालकांनी आणि शिक्षकांनी ती करून द्यायला हवी. दहावी आणि बारावी या परीक्षांमधील कामगिरीत मोठी तफावत राहते, असा अनुभव आहे. वैयक्तिक पातळीवर ही तफावत राहू नये, यासाठी दहावीपर्यंतचे गांभीर्य विद्यार्थ्यांनी पुढे टिकवायला हवे. बारावीची परीक्षाही दहावीसारखी असली, तरी अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी अनेक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यांचे तंत्र मात्र निराळे असते. ते या विद्यार्थ्यांना आता आत्मसात करावे लागेल. दहावीच्या निकालानंतर मुंबई, पुणे, नागपूर, आदी शहरांत अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आणि लवकर पूर्ण करण्याचे आव्हान आता यंत्रणेसमोर आहे.
