संगमनेर : झुंजार न्यूज

वृक्ष हे मानवी जीवनातील अविभाज्य घटक असून वृक्ष रोपन करणे ही काळाची गरज असून केवळ वृक्षारोपन करून चालणार नाही तर त्याच्या संगोपनाची ही लोकांनी काळजी घेतली पाहिजेल असे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी केले .
संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वटपौर्णिमेनिमित्त संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपन करण्यात आले . 
यावेळी  ग्रामविकास अधिकारी श्रीमती अलकाताई गाडे , सरपंच सुदाम खैरे , ग्रामपंचायत सदस्य सौ सचिता दिनकर घुले , सौ अलका दये ,  झेलम खुळे , अंगणवाडी सेविका वैशाली घुले , सौ सुजाता घुले , कैलास आव्हाड , मोकळ  दिनकर घुले , सिताराम खुळे ‘ आदीसह महीलासह ग्रामस्थ उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed