धार्मिकतेचे होत असलेले राजकारण अत्यंत दुर्दैवी -आमदार थोरात
संगमनेर / झुंजार न्यूज
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023- 24 गाळप हंगामाच्या पहिल्या मिल रोलरचे पूजन प्रसंगी ते बोलत होते .यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ हे होते तर व्यासपीठावर कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक संपतराव गोडगे, मीनानाथ वर्पे, रमेश गुंजाळ, विनोद हासे ,भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, अभिजीत ढोले, माणिकराव यादव , रामदास वाघ,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर ,सेक्रेटरी किरण कानवडे, अशोक मुरकुटे ,नवनाथ गडाख, शंकर ढमक आदींसह सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या काटकसर, पारदर्शकता या तत्त्वावर काम सुरू आहे. त्यामुळे संगमनेरचा सहकार हा राज्याला दिशादर्शक असून या कारखान्यामुळे व सहकारी संस्थांमुळे अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे.
आपल्या चांगल्या कामाला कायम परमेश्वराचे आशीर्वाद लागले आहे .कारखान्याचे यश हे शेतकऱ्यांना दिले जाणारा उसाचा भाव व कामगारांना पेमेंट यावरही अवलंबून असते. संगमनेर तालुक्यात सुसंस्कृत व प्रगतीचे वातावरण आहे. मात्र हे चांगले वातावरण काहींना पाहवत नाही म्हणून ते हेतू पुरस्कर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत .विकासकामे थांबवता येत नाही मग धार्मिकतेचे राजकारण केले जात आहे .
गुन्हेगारांना कडक शिक्षा झालीच पाहिजे या मताचे आपण आहोत मात्र त्याची संधी शोधून धार्मिकतेचे राजकारण नको आहे. दिल्लीमध्ये महिला खेळाडू अनेक दिवसांपासून आंदोलन करतात त्याबाबत एकही पदाधिकारी बोलायला तयार नाही सोशल मीडियावर बोलणारे ही गप्प असतात. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे .देशाच्या विकासासाठी सर्वधर्मसमभाव व राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे ही आवश्यक आहे
संगमनेरचा सहकार आपल्याला जपायचा आहे आणि तो वाढवायचा आहे याकरता सर्वांनी कटिबद्ध राहावे असे आवाहन ही त्यांनी केले. यावेळी शरद गुंजाळ, किशोर देशमुख, भाऊसाहेब खर्डे, बाबासाहेब वरपे ,संजय पाटील, यादव, श्री बरकले, पंडित कानवडे ,अमोल दिघे आदींसह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आभार प्रदर्शन कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी केले
