कोपरगाव / झुंजार न्यूज
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील अभियंते राजेश यशवंतराव कुलकर्णी यांचे सासरे व संत साहित्याचे अभ्यासक, स्वामीसेवक दत्तरत्न नारायण काका कुलकर्णी यांनी सुश्लोक सहस्रनाम स्वामी समर्थ हा ग्रंथ लिहिला असून त्याचे प्रकाशन रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक येथे डीजीपीनगर क्रमांक एक, निरामय ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात वरद प्रकाशनतर्फे ज्योती उद्योग समूहाचे संस्थापक वसंतराव खैरनार यांच्या हस्ते, तर रवींद्र रोजेकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे .

तरी अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यातील स्वामीसमर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजेश व नूतन कुलकर्णी यांनी केले आहे. अक्कलकोट स्वामींचे बदलापूरचे प्रख्यात स्वामीभक्त स्व. नागेश करंबेळकर यांच्या समुद्र भरला आहे ह्या साक्षात्कारी ग्रंथावर आधारित हा ग्रंथ लिहिला आहे .
विरेंद्र जोशी ( कोपरगांव )
