संगमनेर । झुंजार न्यूज
महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान असणाऱ्या सहकारी साखर कारखाना विभागाच्या साखर आयुक्त पदाचा कार्यभार चंद्रकांत पुलकुंडावर यांनी स्वीकारला असून त्यांचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर लेबर ऑफिसर ॲड .शरद गुंजाळ, पंडितराव शिंदे यांनी नवनियुक्त साखर आयुक्त चंद्रकांत पुलकंडावर यांचा सत्कार केला आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने देशातील सहकारासाठी आदर्शवत काम केले आहे. शेतकरी सभासद ऊस उत्पादक व कामगारांचे हित जपताना या कारखान्याने कायम विक्रमी गाळप करताना उच्चांकी भाव दिला आहे. चांगले व्यवस्थापन व गुणवत्ता पूर्ण काम यामुळे या कारखान्याला राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार मिळाले आहेत.

राज्यभरात अनेक ठिकाणी सहकार चळवळ मोडकळीस आली असताना संगमनेरचा सहकार मात्र राज्याला मार्गदर्शक ठरला आहे.

यावेळी कारखान्याच्या वतीने नवनियुक्त आयुक्त यांना भेटीचे निमंत्रण दिले असून त्यांनीही थोरात कारखान्याला भेट द्यायला नक्की आवडेल असे सांगितले आहे
