संगमनेर | झुंजार न्यूज 

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध गावांमधील पाझर तलाव दुरुस्ती करता मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून मोठा निधी मिळवला असून याच अंतर्गत चंदनापुरी तामकडा येथील पाझर तलाव दुरुस्ती साठी 49 लाख 91 हजार रुपयांचा निधी मिळाला असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केले आहे

चंदनापुरी घाटातील तामकडा येथील पाझर तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ मा.आ डॉ तांबे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत  यावेळी समवेत आर बी राहणे, शांताराम कढणे, नवनाथ अरगडे, विजय राहणे,  सरपंच भाऊराव रहाणे ,रमेश गुंजाळ , शंकर राहणे, कैलास सरोदे, बालम सरोदे, बाबुराव रहाणे, अनिल कढणे, भाऊसाहेब कढणे , माधव वाळे,  के जी रहाणे,आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते


यावेळी बोलताना आमदार डॉ तांबे म्हणाले की, तामकडा हा चंदनापुरी घाटातील प्रेक्षणीय कडा असून पावसाळ्यामध्ये हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटन घेत असतात. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी या परिसराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून तामकडा साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्ती करता मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत शासनाकडे निधी ची मागणी केली होती. यानंतर या कामाला 27 जानेवारी 2022 रोजी निधी साठी मंजुरी मिळाली.


 मात्र आमदार थोरात यांच्याच पाठपुराव्यातून मिळालेल्या या निधीतून या साठवण पाझर तलाव याची दुरुस्ती होणार आहे .
याचबरोबर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालव्याची कामे आमदार थोरात यांनीच पूर्ण केली असून आता तळेगाव भागात सुद्धा पाणी पोहोचवले आहे .


आमदार थोरात सातत्याने काम करतात मात्र प्रसिद्ध कधीही करत नाही. आपण सर्वांनी विकास कामाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन ही त्यांनी केले.

तर विजय राहणे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुराव्यातून मिळवलेल्या निधी नंतर काही समर्थकांच्या मागणीवरून खासदार महोदयांनी सरकारला पत्र दिले. परंतु हे पत्र आठ महिने उशिरा दिलेले आहे मंजूर झालेल्या निधीसाठी पत्र देणे केविलवाना प्रयत्न असल्याची त्यांनी म्हटले आहे.

यावेळी चंदनापुरी, आनंदवाडी व परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने   उपस्थित 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed