संगमनेर / झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील नवोदय विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताश्याच्या गजरात मिरवणुक काढत पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे प्रतिक म्हणून विद्यार्थ्यांनी डोक्यावर फेटा बांधला होता. पारंपरिक पद्धतीने फेटा बांधून विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वारावर आगमन होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

उन्हाळी सुट्टी संपवून आज विद्यार्थ्यांचे सकाळपासूनच घोळके रमत -गमत शाळेच्या आवारात परिसरात मार्गस्थ झाले होते. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी वह्या, पुस्तके, लेखन साहित्याचे उपस्थितांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुधाकर जाधव, अशोक बाभुळके, रावसाहेब गीते, सुभाष आंधळे, दिलीप बर्डे, श्रीकांत कुलकर्णी, संजयकुमार नागरे व धनश्री खेमनर,व संगिता राहाणे यांनी नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल मुन्तोडे यांनी केले.भोजन व्यवस्था भाऊसाहेब बर्डे, सुनिता बर्डे, सुभाष मुन्तोडे व विजयकुमार खरात यांनी केली.
