संगमनेर । झुंजार न्यूज

राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील गावांना जोडणारा ५० ते ६० वर्ष पासून खडबडीत असणारा हंगेवाडी ते पानोडी रस्त्याकरिता १ कोटी ९० लाख रुपये मंजूर झाल्याने संबंधीत रस्त्याशी जोडणारे प्रवाशांनी निर्णयाचे स्वागत केले असल्याची माहिती मालुंजेचे माजी संरपच तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष संदिपराव घुगे यांनी दिली आहे . 

यावेळी संदिप घुगे पुढे म्हणाले की , पुर्व भागातील हंगेवाडी , मालुंजे , डिग्रस , अंभोरे , हजारवाडी , पानोडी पुढे पिंप्री लौकी अजमपूर , खळी मार्गे झरेकाठी या गावां हा रस्ता जोडला जात असल्याने हा फार महत्वाचा समजला जात असून गेल्या ५० वर्षापासून या रस्त्यांनी प्रवाशी प्रवास करत आहे . आजूबाजूच्या मिरवून घेणाऱ्या मोठ्या हे सुचलेचं नाही . जे आपल्या गावांला साधे पिण्याचे पाणी देवू शकले नाही ते या रस्त्यासाठी काय ? प्रयत्न करणार आजही वाड्या – वस्त्यावर टँकरने पाणी पुरवठा होत असल्याचे चित्र दिसत आहे .

राज्याचे महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले लक्ष्प केंद्रीत केल्याने खर्‍या अर्थाने पुर्व भागातील गावांच्या विकासाला चालना मिळू लागली आहे . मालुंजे सारख्या शिर्डी विधानसभा मतदार संघात गाव नसताना ही मागचा – पुढचा विचार न करता कोट्यावधी रुपये देवून विकासाची गंगोत्री निर्माण केली . वर्षानुवर्ष पिण्याच्या पाण्यासाठी गावकर्‍याना वणवण करावी लागत होती हे ओळखून तातडीने साडे तीन कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर करत स्त्रीच्या डोक्यावरील हंडाचं नाहीसा केला . पाण्यासाठी टँकर आल्यावर धावपळ करणाऱ्यांच्या दारासमोर पाण्याचा नळ दिसून येत आहे हे केवळ विखे पाटील परिवारामुळेचं दिसत आहे . तसेच ८५ लाख रुपये किंमतीचा गोसावी फाटा ते मालुंजे पर्यत रस्ता दुरुस्तास मंजूरी मिळाली .

चौकट
मालुंजे गाव हे शिर्डी विधानसभा मतदार संघात नसतानासुद्धा विखे पाटील यांच्याकडून मिळणाऱ्या प्रत्येक निधी पुरेपुरे वापर होत असून पानोडी तर जलजीवन योजना होवून सुद्धा त्या कामाला अदयाप सुरु न झाल्याचे दुदैव आहे कुठल्याही विकास कामांना चालना मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे 
संदिप घुगे ( माजी संरपच मालुंजे  तथा संरपच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष ) 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *