संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील शेतीसह पुरक व्यवसायाला चालना देणारे युवा शेतकरी प्रकाश वसंतराव जोशी यांना सेंद्रीय शेतीसह गट शेतीला प्राधान्य देत कांदा पिकांचे उच्चांक केला पुरक व्यवसाय म्हणून मुक्तसंचार गोठा स साकारला तर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी हा पुरस्कार देऊन जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.
तालुक्यातील दाढ खुर्द यांनी उत्तमरित्या शेती फुलवत शेतीमधून वेगवेगळे प्रयोग करत शेतीतून भरघोस पिके काढण्याचा प्रयत्न केला तर पेरु , आंबा सारखे फळाचे रोपे बांधावर लावून शेती चा पुरेपुर उपयोग केला. तसेच शेती पुरक व्यवसाय म्हणून दुध व्यवसायाला प्राधान्य देत आर्थिक नियोजनाची घडी बसविली याकरिता तालुका कृषी विभागाने नेहमीच सहकार्य करून प्रोत्साहन दिले. नव नविन प्रयोग वापरुन कांदा उत्पादनाचा उच्चांक केला शेतीची सेंद्रीय पध्दतीनी मशागत केल्याने उत्पादनही वाढले. या आदर्श कामाची दखल कृषी विभागाने घेतली व त्यांना या वर्षीचा जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आत्मा प्रकल्प संचालक विलास नलगे , उपसंचालक राजाराम गायकवाड , उपविभागीय कृषी आधिकारी पोपटराव नवले , महात्मा फुले कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ विक्रम कड , कृषी अधिकारी निलेश कानवडे , डी आर डी प्रकल्प संचालक सुनिल पठारे , कृषी संचालक किरण मोरे , क्रांती चौधरी , सौ संगिता जोशी , वसंतराव जोशी , हिराबाई जोशी , संदिप जोशी , संतोष जोशी आदी शेतकरी उपस्थित होते.
