कोपरगाव

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साईबाबा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त देश विदेशातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हजारो साई भक्तांनी बाबांच्या दक्षिणापेटीत कोट्यावधीचे दान केले, तर आंध्रप्रदेश येथील साईभक्त वामसी कृष्णा विटला यांनी सुमारे १९ लाख ४६ हजार रुपयाचा सोन्याचा मुकुट साईबाबांना दान केला.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर गुजरातसह राज्‍याच्‍या विविध भागातून आलेल्‍या पालखीतील साईभक्‍तांच्‍या साईनामाच्‍या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.

उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली.काकड आरतीनंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी श्री.सिध्‍दाराम सालीमठ यांनी वीणा व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर (भा.प्र.से.) व वैद्यकिय संचालक ले.कर्नल डॉ.शैलेश ओक यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे व प्रज्ञा महांडुळे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहाटे मंगलस्नान झाले, श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या निमित्‍त अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्नी सौ.मालती यार्लगड्डा यांनी श्रींची पाद्यपूजा केली. प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा , तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी श्री.सिध्‍दाराम सालीमठ व संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांचे हस्‍ते श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्‍यात आला. गुजरातसह राज्‍यातील विविध ठिकाणाहुन आलेल्‍या शेकडो पालखीतील साईभक्‍तांच्‍या साईनामाच्‍या गजराने शिर्डी दुमदुमून गेली होती.

ह.भ.प.डॉ.प्रज्ञा देशपांडे-पळसोदकर, आंबेगांव, पुणे यांचे कीर्तन झाले. विनीता बजाज, दुर्गा साई मंडळ, दिल्‍ली यांचा भक्‍ती गीतांचा कार्यक्रम झाला. श्रींच्या रथाची गावातुन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे अध्‍यक्ष, सदस्‍य, अधिकारी, कर्मचारी, साईभक्त, ग्रामस्थ आणि बँड पथके मोठ्या संख्येने सहभागी झाले.

समाधी मंदिरासमोर कलाकारांच्या हजेरीचा कार्यक्रम झाला. उत्सवाच्या मुख्य दिवशी श्रींचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनाकरीता खुले होते.

उत्सवाच्या सांगता दिनी मंगळवार ०४ जुलै रोजी पहाटे श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, श्रींची पाद्यपुजा व गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा झाला होणार असुन, सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.डॉ.प्रज्ञा देशपांडे-पळसोदकर, आंबेगांव, पुणे यांचा गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम झाला आहे

जव कुमार, पुणे यांचा भजन संध्‍या भक्‍ती गीते कार्यक्रम झाला.

गुरूस्थान मंदिरात संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर व पत्नी सौ.सुप्रिया यांच्या हस्ते सांगता दीनी रुद्राभिषेक करण्यात आला.

श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या सांगता दिनी काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे व प्रज्ञा महांडुळे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

गोजिरवाणी मुलांची पहिलीच साई गुरुपौर्णिमा.

श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार पी. शिवा शंकर यांनी स्वीकारल्यानंतर त्यांच्या गोजिरवाण्या मुलांच्या जीवनात साई गुरुपौर्णिमा पहिलीच ठरली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed