संगमनेर / झुंजार न्यूज 

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडला. या राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू ठरले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार. अजित पवार यांच्यासह एक मोठा गट राज्य सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार यांच्यासह एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी साडे 3 वर्षात भाजप, मविआ आणि त्यानंतर महायुतीकडून उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आणखी एका मोठ्या पक्षात धमाका होणार असल्याचा दावा होत असून २०१९ पासून भाजपाच्या गळाला तीन विरोधी पक्षनेता लागल्याचे चित्र दिसले .

राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेमध्ये धमाका होणार असल्याचा दावा राजकिय तज्ञ सांगत आहे. मात्र यापुर्वीचं २०१९ विरोध पक्ष नेते असलेले विखे पाटील हे कॉग्रेस सोडून भाजपाच्या कळपात गेले होते मात्र काही कॉग्रेसी नेते गळाला लागण्याची शक्यता असल्यानेचं  राजकिय विश्वलेष दावा करत असल्यानेचं राजकीय विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र कॉग्रेस पक्षाचाचं विरोधी पक्ष नेता होणार असल्याने भाजपाची त्या नेत्यावर नजर असणार हे मात्र नक्कीचं ! 

अजित पवार यांनी भाजपाशी सलगी करत राष्ट्रवादी पक्ष आपलाचं असा दावा केला यापुर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिवसेना ही आपली दावा केला यात शिवसेनेचे दोन गट झाली एकमेकावर आरोप केल्याने न्यायालयामार्फत दोन्ही सेनेला पक्षाचे नविन नावे देत चिन्ह दिले मग यांची कसोटी लागली ते १२ आमदार पात्र कि अपात्र हा निर्णय गुलदस्त्यात असतानाचं एक वर्षानंतर अजित पवार यांनी आपल्या ९ सहकार्‍या समवेत सरकारमध्ये सामिल झाले . नव्या मंत्र्यांची भाषणे झाली आमच्या दैवताला बडव्यानी घेरले जे पक्ष स्थापनेपासून एकमेकाच्या सोबत होते . आता वाईट दिसू लागले हा करिष्मा फक्त सत्तेचा कि दुसरा कसला ? हे समजणे जनता खुळी राहिली नाही हे मात्र नक्की .
भाजपाच्या धोरणामुळे देशात विरोध एकवटल्याने आता २०२४ काही खर दिसत नाही या भीतीपोटी कणखर नेतृत्वचं ढेसूळ करायचे हे धोरण आखत पहिला बळी झाला तो उद्धव ठाकरे यांचा दुसरा ते शरदराव पवार यांचा या दोन्ही राजकिय भुंकपाने राज्यासह देशात अस्वस्थता पसरली . अजित पवार यांच्या तबूत जरी ४० शिलेदार आले मात्र नवीन शिलेदार निर्माण करण्याची ताकद शरदराव पवार यांच्यात असल्याची आज पर्यतचा इतिहास आहे .
पुढे काय ? होवो मात्र २०२४ ला नरेंद्र मोदीनाचं पंतप्रधान करायचे याकरिता भाजपाने कंबर कसली आहे देशात मोदी – शहा करिष्मा दाखवत आहे तर राज्यात देवेंद्र फडणवीस आपली मुख्यमंत्री पदाची आकांक्षा मारत नव्या शिलेदारांना दरवाजा उघडत आहे . नवे शिलेदार आल्याने एकनिष्ठ असणार्‍या पदाधिकारी , कार्यकर्ते यांचे काय ? यावर कोणीही वाच्यता करत नसले तरी या तिन पैलूच्या सरकारमधील नव्या पाहुण्यांचे वरवर स्वागत होईल मात्र भविष्य काय ? या पुर्वी ही शिवसेना – कॉग्रेस – राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले . त्यामध्ये तू तू – मै मै झाल्यानेचं अडीच वर्षातचं भुंकप झाला . मुख्यमंत्री महत्वकांक्षापोटी एकनाथ शिंदेसह अन्य शिलेदारांनी पक्ष प्रमुखाला टार्गेट करत व सहयोगी पक्षाचे नेते दुज्याभाव करतात ही टिका करत वर्षपूर्ती केली त्यानंतर ज्याच्यावर टिका झाली तेच आता मुख्यमंत्री शिंदे सोबत काम करण्यास पुढे आले .
२०१९ पासून राज्यातील जनता तीन तिघाडी , काम बिघाडी सरकारचे काम बघत आहे . यामुळे लोकांचे मनोरंजन झाले मात्र हा खेळ कधी संपणार यांची वाट लोक बघत असून २०२४ मात्र करिष्मा होणार कोण होणार सिंकदर ?     

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed