संगमनेर / झुंजार न्यूज
मणिपूर राज्यांतील ख्रिस्ती समुदाय व चर्चवर होणाऱ्या हल्ल्याचा महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद, आरपीआय, बहुजन विकास परिषद, दलित पँथर, मातंग एकदा आंदोलन या संघटनेच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या बाबतचे निवेदन प्रांत कार्यालयीन प्रतिनिधी संतोष काळंगे यांना देण्यात आले.
अनिल भोसले यांनी निवेदना म्हटले की, मणिपूर राज्यातील ख्रिस्ती समुदाय व चर्चवर हल्ले करून ख्रिस्ती समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच देशात हिंसा व द्वेश पसरविण्याचा उद्देश होताना दिसतो. हे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने या घटनेचे गांभिर्य ओळखून हल्ले त्वरित थांबबावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जर होणाऱ्या हल्ल्यांना रोखले नाही तर देशात इतर राज्यांमध्ये सुद्धा चर्चवर हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या हल्ल्यात मृत पावलेल्यांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच मणिपूर राज्यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, प्रा.बाबा खरात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी चे जिल्हाध्यक्ष अँड. किरण रोहम आरपीआय तालुका अध्यक्ष आशिष शेळके, दलित पँथरचे शहराध्यक्ष राजू खरात, बहुजन विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष किशोर चव्हाण, मातंग एकदा आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष मंजाबापू साळवे, प्रवीण गायकवाड, रवी गिरी, प्रभाकर चांदेकर, रमेश ओहोळ, बाळासाहेब भोसले, सादिक तांबोळी, सनी गायकवाड, विनोद गायकवाड, संदिप मगर, प्रशांत यादव, सचिन मुन्तोडे, राजू साळवे, इग्नाथी सोनवणे, विजय खरात आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 669
