आ.थोरात हे विकासपुरुष : आ. सत्यजित तांबे

संगमनेर । झुंजार न्यूज 

जनतेच्या प्रेमामुळे राज्यभरात काम करण्याची संधी मिळाली या संधीचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या विकासाकरता केला. निळवंडे धरण व कालव्यासाठी दररोज पाठपुरावा करून हे ऐतिहासिक काम पूर्ण केल्यानंतर कालव्यांद्वारे पाणी दुष्काळी भागात आले असून हे पाणी जास्तीत जास्त क्षेत्राला मिळेल असे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्यांचे शिल्पकार व जलनायक काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

चिंचोली गुरव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, बाबा ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे ,शंकर पा खेमनर, संपतराव गोडगे, अविनाश सोनवणे ,हौशीराम सोनवणे, रामहरी कातोरे, सिताराम राऊत, अजय फटांगरे, सौ बेबीताई थोरात, भारत मुंगसे, सुभाष सांगळे, सचिन दिघे, बाबजी कांदळकर ,प्रभाकर कांदळकर ,अनिल कांदळकर, तळेगावच्या सरपंच उषाताई दिघे, विलास सोनवणे ,विलास अण्णा सोनवणे ,सोमनाथ आभाळे, सौ संगीता बर्डे , स्वप्निल गोडगे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.. यावेळी सुमारे 25 कोटींच्या विविध रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केले आणि या प्रेमामुळे राज्यभरात काम करण्याची संधी मिळाली या संधीचे सोने करताना तालुक्याचा देशभर सन्मान वाढवताना विकासाचा वेग कायम राखला. संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा असून प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत.

चिंचोली गुरव ची पाणी परिषद ही निळवंडे धरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली असून 1999 ला निळवंडे धरणाचे काम खऱ्या अर्थाने सुरू झाले . 2012 ला भिंतीचे काम पूर्ण झाले याच कालावधीत मोठ मोठ्या बोगद्यांचा कालव्यांची कामे मार्गी लागली होती .मात्र 2014 ते 19 कामे थंडावली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येतात या कामाला अत्यंत गती दिली. या उन्हाळ्यामध्ये दहा टीएमसी पाणी धरणात शिल्लक होते. अशावेळी कालव्यांची चाचणी घेण्यासाठी सरकारला आग्रह केला. कालव्यांद्वारे दुष्काळी भागात पाणी आले.जनतेमध्ये मोठा आनंद निर्माण झाला. मात्र हा आनंद काही लोकांना पहावला नाही. त्यांनी तात्काळ पाणी बंद केले.

नियतीने आपल्या हातून निळवंडे धरण व कालवे करून घेतले असून यापुढील काळ हा काँग्रेसचाच राहणार असून कोणीही या पाण्यापासून वंचित राहणार नाही असे सांगताना तालुक्यात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागत आहे. मात्र दर्जेदार काम होण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून काम करून घ्यावे असे आवाहन ही त्यांनी केले.

माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की ,तालुका मोठा असूनही विकासाचा ध्यास घेतलेल्या नेतृत्वामुळे संगमनेर तालुका हा राज्यात अग्रगण्य म्हणून ओळखला जातो. देशात सध्या जातीच्या नावावर राजकारण करणारे सरकार असून मणिपूरमध्ये महिलांवर मोठा अत्याचार होतो आहे .अत्यंत बेजबाबदार राज्यकर्ते सरकारमध्ये असून लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आ थोरात यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले.

सत्यजित तांबे म्हणाले की आमदार थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक गावासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला असून निधीसाठी पाठपुरावा करणे अत्यंत गरजेचे असते.  मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सर्व मंत्री यांच्यासह सर्व विरोधकही आमदार थोरात यांचा सन्मान करतात. आमदार थोरात निळवंडे धरणासह तालुक्यातील मोठमोठी कामे केली असून यामुळेच ते खऱ्या अर्थाने या विकास पुरुष ठरले आहेत.

तर जि.प सदस्य महेंद्र गोडगे म्हणाले की आ थोरात यांच्यामुळेच कालव्यांची कामे पूर्ण झाली असून आपल्या भागात निळवंडे चे पाणी आले आहे. आपसातील मतभेदाचा फायदा आहे विरोधक घेत असून गावाच्या व तालुक्याच्या विकासासाठी एकत्र या. तळेगाव विभागात जास्तीत जास्त रस्त्यांची कामे होत असून प्रत्येक गावाने गुणवत्ता पूर्ण काम करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राजेंद्र कहांडळ, सखाराम शर्माळे, अनिल घुगे,राजेंद्र मुंगसे, निलेश थोरात, आत्माराम जगताप, सतीश गोडगे, विजय गोडगे, ज्ञानेश्वर मुंगसे, आदींसह पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास मास्तर सोनवणे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व स्वप्नील गोडगे यांनी केले तर शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे यांनी आभार मानले

चौकट

चिंचोली- नान्नज सोनुशी,मालदाड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ



संगमनेरच्या उत्तर भागातील सर्व गावांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या चिंचोली गुरव नान्नज दुमाला सोनोशी मालदाड या 19 किमी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार थोरात यांनी केला असून गुणवत्ता पूर्ण काम व्हावे अशा सूचनाही सर्व कॉन्ट्रॅक्टर यांना दिल्या असून ग्रामस्थांनीही चांगले काम करून घ्यावे असे आवाहन केले.

फक्त व्हाट्सअपवर बोलणा-यांचे समाजासाठी काय योगदान

ज्या लोकांनी समाजासाठी, गावासाठी काहीच केले नाही इतकेच काय तर स्वतःच्या कुटुंबासाठी ही जे काही करू शकले नाही. अशी मंडळी व्हाट्सअप वर टीका करत असतात. प्रत्येक गावात असे मोजके लोक आहेत. त्यांना  जनतेत स्थान नसून त्यांना तरुणांनी तोडीस तोड उत्तर द्यावे असे आवाहन आमदार थोरात यांनी केले
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed