एस एम बी टी डेंटल कॉलेज, जय हिंद आदिवासी आश्रम शाळेचा सहभाग
संगमनेर । झुंजार न्यूज
थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेले दंडकारण्य अभियान ही लोक चळवळ बनली आहे. ही चळवळ पुढे नेताना तालुक्यात वनराई मोठ्या प्रमाणात वाढली असून दंडकारण्य अभियान हे पर्यावरण संवर्धनाची दिशा देणारे ठरले असल्याचे गौरव उद्गार प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे यांनी काढले आहे
कोळवाडे येथील मोरया डोंगरावर दंडकारांनी विभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर रॉबर्ट डिकोष्टा हे होते. तर व्यासपीठावर दंडकारांनी अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे , एसएमबीटी डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील , जय हिंद आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दशरथ वर्पे , सरपंच सौ पुष्पा गुंजाळ , आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, संगमनेर उपवन विभाग अधिकारी श्री पाटील , श्री सांगळे , दंडकरण्य विभागाचे बबन सावंत , बाळासाहेब फापाळे, प्रा. पंकज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, झाड लावणारा माणूस या पुस्तकातून प्रेरणा घेऊन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली दंडकारण्य अभियान हे आता एक मोठी लोक चळवळ झाली आहे. ती वरील प्रदूषण कमी करायचे असेल तर वनसंवर्धन झालीच पाहिजे वने जगली तर पशुपक्षी प्राणी जगतील जैविक साखळी अबाधित ठेवायची असेल तर वृक्ष संवर्धन केलीच पाहिजे. आज वृक्षतोडीमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे ऋतुमानात बदल होत आहे हे थांबवण्यासाठी एकच उपाय आहे झाडे लावा झाडे जगवा पाणी आडवा पाणी जिरवा राज्यातील वनक्षेत्र 20% वरून 33% पर्यंत नेणे आवश्यक आहे असेही यावेळी सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रॉबर्ट डिकोष्टा म्हणाले की, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात दूरदृष्टीचे नेते होते भविष्याची पिढी टिकवायची असेल तर दंड कारणे विभागाच्या वतीने वृक्ष लागवड वृक्ष संवर्धनाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम नियोजनपूर्वक कार्यान्वित यांनी केला. पृथ्वीवर वृक्ष वाढले तर पाण्याचा स्रोत वाढेल जैविक साखळी तयार झाली पाहिजेत ग्लोबल वारूंमुळे बर्फाच्छादित शिखरावरील बर्फ वितळले तर गंगा नदीसारख्या नद्या आठवून जातील सगळीकडे दुष्काळाचे साम्राज्य वाढेल वने नष्ट होतील नैसर्गिक स्रोत संपतील आणि पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यातील त्यासाठी वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे नाहीतर भावी पिढी आपल्याला क्षमा करणार नाही असेही प्राध्यापक फादर डिकोष्टा म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले. यावेळी त्यांनी गेल्या दोन वर्षात मोरया डोंगर, फादर हर्मन हिल येथील डोंगरावर केलेल्या वृक्षारोपणाची आकडेवारी, नियोजन ,वृक्ष संवर्धन याबाबत उपस्थित त्यांना सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील एस एम बी टी डेंटल कॉलेज प्राचार्य डॉ. अशोक पाटील यांनीही मनोगति व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश दिघे यांनी केले तर आभार बबन सावंत यांनी मांडले या कार्यक्रमास एस एम बी टी डेंटल त्याचा स्टाफ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी ,जय हिंद आदिवासी आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,गावातील ग्रामस्थ , महिला बचत गट कार्यकर्त्या आदी उपस्थित होत्या.
Post Views: 668
