संगमनेर । झुंजार न्यूज
गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणाचे केंद्र असलेल्या अमृतवाहिनी संस्थेतील अमृतवाहिनी पदविका औषधनिर्माणशास्त्र (डी.फार्मसी) महाविद्यालयास म.रा.तं. शि मंडळातर्फे करण्यात आलेल्या बाह्य संस्था सर्वेक्षणामधून एक्सलेंट महाविद्यालय दर्जा प्राप्त झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.पी. शिरभाते यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ शिरभाते म्हणाले की,दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या बाह्य संस्था अवेक्षण समितीद्वारे प्रत्यक्षपणे शैक्षणिक गुणवत्ता, सोयीसुविधा, विविध उपक्रम इ.च्या आधारे ३०० गुणांचे अवेक्षण करण्यात आले व दिनांक २० जुलै २०२३ रोजी बाह्य संस्था अवेक्षण मूल्यांकनाच्या आधारे अमृतवाहिनी डी फार्मसी ला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय दर्जा जाहीर करण्यात आला.
अमृतवाहिनी डी फार्मसी महाविद्यालय हे विद्यार्थ्यासाठी सर्व सोयीयुक्त महाविद्यालय असून विद्यार्थ्याना प्रशस्त इमारती सोबतच सुसज्ज लॅबोरेटरी, ग्रंथालय, इंटरनेट, मुलामुलींसाठी स्वतंत्र होस्टेल, अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग तसेच अदययावत सोयी सुविधा पुरविल्या जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी व्यक्तिमत्व विकास शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण असे विविध उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात.
व्यक्तिमत्व विकासासोबतच विद्यार्थ्यांनी सामाजिक बंधिलकी म्हणुन वेगवेगळ्या ठिकाणी विविध आजार, त्यावरिल उपचार व मेडिसिनस याबद्दल जनजागृती रॅलीचे आयोजन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महाविद्यालयात दरवर्षी वेगवेगळया कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्युह, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांवर गेस्ट लेक्चर्स, तसेच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास उंचविण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्वांच्या व्याख्यानांचे वेळोवेळी आयोजन केले जाते..
विद्यार्थ्यांमध्ये असणारे क्रीडा गुण विकसीत होण्यासाठी महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन तसेच महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांना पाठविले जाते. विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयुताई देशमुख व युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतुन साकारलेला मेधा या युवा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाठी वेगवेगळ्या जिल्हा व राज्य स्तरीय पेपर प्रेझेन्टेशन, प्रोजेक्ट कॉम्पीटेशन यांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागासाठी मार्गदर्शन केले जाते. या सर्व उपक्रमांची व महाविद्यालयाच्या कामगीरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून “सर्वोत्कृष्ट” पदविका औषधनिर्माणशस्त्र महाविद्यालय
दर्जा जाहीर करण्यात आलेला आहे.
या सर्व उपक्रमांची तसेच शैक्षणीक दर्जा, सोयीसुविधा इ.ची दखल घेत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून पदविका महाविद्यालयात नव्याने बी. फार्मसी अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे मा. महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त मा. आ. डॉ. सुधिर तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजितभाऊ थोरात, संस्थेच्या विश्वस्थ सौ. शरयुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. शिंदे यांनी महाविद्यालयाच्या या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरभाते एम. पी. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे
