संगमनेर । झुंजार न्यूज
ग्रामीण भागात होणारी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ससेहोलपट थांबवण्यासाठी आणि त्यांना गावातच शिक्षण मिळावे व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकावा अशी धारणा घेऊन स्व.भिमाजी आंबुजी शिंदे यांनी स्वतःची जमीन विद्यालयाच्या इमारतीसाठी दान केली. त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोउद्गार भिमाजी आंबुजी शिंदे,बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य के.के जाधव यांनी काढले.
संगमनेर शेतकी संघाचे माजी संचालक तथा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे निकटवर्तीय सहकारी स्व.भिमाजी आंबुजी शिंदे यांची २३ वी पुण्यतिथी तालुक्यातील रहिमपूर येथील भिमाजी आंबुजी शिंदे,बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरी करण्यात आली. त्यावेळी प्राचार्य के.के जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक नानासाहेब शिंदे होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे या उदात्त हेतूने स्व.भिमाजी आंबुजी शिंदे यांनी स्वतःची जमीन विद्यालयाच्या इमारतीसाठी दान दिली. या ज्ञान मंदिरातून हजारो विद्यार्थी शिकून मोठे झाले. त्यांचे भविष्य घडविण्याचे पवित्र काम या विद्यालयाच्या माध्यमातून घडले, याचे सर्व श्रेय स्व. भिमाजी आंबुजी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांना असल्याचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक नानासाहेब शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी विद्यालयात पाचवी ते बारावी विद्यार्थांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांची ही भाषणे झाली. यावेळी संचालक नानासाहेब दौलत शिंदे, स्व.भिमाजी आंबुजी शिंदे यांचे नातू संदीप शिंदे, सहकारमहर्षी
भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब शिंदे ,पोलीस पाटील आबासाहेब शिंदे, अमृतवाहिनी बँकेचे संचालक अण्णासाहेब शिंदे, माजी सरपंच बाजीराव शिंदे, सरुनाथ शिंदे, रामनाथ शिंदे , दत्तात्रय खुळे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्व. भिमाजी शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच त्यांच्या स्मरणार्थ विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. विविध मान्यवरांची यावेळी भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजू जगताप यांनी केले तर आभार श्री.डोंगरे यांनी मानले.
Post Views: 660
