संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागातील असणाऱ्या दऱ्यातील वाटी सारख्या खरशिंदे गावाला जोडणाऱ्या खरशिंदे फाटा ते खरशिंदे , खरशिंदे ते खांबे या ४ कि मीच्या दोन्ही रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून शालेय विदयार्थ्यापासून शेतकरी , प्रवाशी व ग्रामस्थांची मोठी हेडसांड होत आहे. या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी लागणार सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून – बुजुन दुर्लक्ष करत आहे काय ? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

पुर्व व पठार भागातील तालुक्यापासून ४० कि मी अंतरावरील खरशिंदे हे गांव आहे . डोंगरदर्‍ यात गांव असल्याने दळणवळणाचा अभाव दिसत आहे . छोट्या – मोठ्या वस्तु करिता गावातील नागरिकांना १५ – २० कि मी असणाऱ्या साकूर अथवा आश्वीशी संपर्क साधावा लागत आहे  खरशिदे फाटा ते गांवापर्यतचा २ कि मी व गांव ते खांबे पर्यतचा डोंगरातून वळणदार व खडकाळ असणारा २ कि मीचा रस्ता म्हणजे ४ कि मी रस्ता हा अतिशय वळणदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे काम  रखडले असून रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे.  या रस्त्याने संबंधीत अधिकारी, लोकप्रतिनिधी ये – जा करत नसल्याने त्यांना रस्त्याची दुरुस्ता का ? कळणार या रस्त्याच्या दुरुस्तीकडे अनेक वेळा डोळे झाक पणा होत आहे.

 या दोन्ही रस्त्यांचा संशोधनाचा विषय आहे . या दोन्ही रस्त्यावर खड्ड्याचे  मोठ्या प्रमाणात साम्राज्य वाढले आहे. सदर रस्ता हा अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. गांव ते खांबे पर्यतचा रस्ताने शालेय विदयार्थ्याना जाताना मोठी कसरत करावी लागत आहे गांवात हायस्कूल नसल्याने २ कि मी अंतरावरील खांबे गांवात विदयार्थ्याना विदया ग्रहण करण्यासाठी जावे लागत आहे शिक्षणांचे महत्त्व समजवून ७० विदयार्थी आपला प्रवास मोठ्या कष्टाने व खडतर मार्गाने काढत आहे .संबंधीत बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांना यांची किंव कधी येणार व रस्त्याच्या दूरुस्ती बाबत दखल कधी घेतली जाणार अशा ग्रामस्थांमधून सूर उमटत आहे . व नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वाहनचालक, शेतकरी, पादचारी व विदयार्थी यांना जीव मुठीत धरून मार्ग क्रमन करावे लागत आहे. संगमनेर तालुक्यातील हे शेवटचे दुष्काळी गांव सातत्याने पाण्याचा अभाव असल्याने कमी प्रमाणात भागायत जमिनी त्यामुळे      टोमॅटो, कांदा, कोबी, फ्लॉवर या आदी पिकांचे कमी प्रमाणावर उत्पादन होते . मुख्य बाजार पेठ तीन दिशेला मात्र अंतरावर त्यामुळे आर्थिक विकासाला आळा बसला . गांव हे खोल दऱ्या असल्याने मोबाईल ही रेंजच्या बाहेर मोबाईल वरुन संभाषण २ कि मी अंतरावरील खरशिंदे फाट्यावर जावे लागते ते ही खडतर रस्त्यांनेचं , 

 तरी संंबंधित विभागाने याकडे लक्ष देवून रस्त्याची दुरुस्ती त्वरीत करावी अशी मागणी तंटामुक्ती अध्यक्ष कासमभाई सय्यद , माजी उपसंरपच साहेबराव वाडेकर , कादरभाई शेख , विलास वाडेकर आदीसह ग्रामस्थांनी केली आहे.
चौकट
आज परिस्थिती पाहता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे. खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने अपघात घडत आहे. वाहने ही नादूरुस्त होत असून गांवाच्या दोन्ही दिशेचे रस्ताचा खराब झाल्याने गावांचा विकास खुंटला त्यामुळे त्याचा आर्थिक भुर्दंड गावांला सहन करावा लागत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेवून रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करावा . 
कासमभाई सय्यद ( अध्यक्ष , तंटामुक्ती समिती खरशिंदे )
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *