संगमनेर । झुंजार न्यूज

प्रत्येक गोष्ट ही जर व्यावहारिक दृष्टीकोनातून बघितल्यास सामाजिक व्यवस्था कोलमडून जाईल . वारकरी संप्रदायामध्ये मोठी ताकद असल्यामुळेचं आज लाखो वारकरी हे पंढरपूरला पायी जात असतात. वडिलांचे आचार – विचार व स्मृती चिरंतन रहावी यासाठी भगवानराव इलग, सुरेश इलग, प्रा. बाळासाहेब इलग व कुटुंबियांनी गावांसाठी भव्य असा वैकुंठ रथ म्हणजेचं स्वर्ग रथ दान दिल्याने मानवी समाज्यातील हे मोठे श्रेष्ठदान असून सामाजिक व सुदंर असणारा हा स्तुतिय उपक्रम असल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले .

 

प्रतापपूरसह परिसरातील गावांतील सर्वसामान्य व्यक्तीसह गोरं गरीब जनतेला येणारी अडचण लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ नेते भगवानराव इलग व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गावाला पाच लाख रुपये किंमतीचा ‘वैकुंठ रथ’ म्हणजेच स्वर्गरथ दान दिल्या प्रसंगी ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी वैकुंठ रथाची चावी ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडे सुपुर्द करुन रथ बांधणाऱ्या कारागिरांचा ना. विखे पाटील यांच्या हस्तें सत्कार करण्यात आला. 
यावेळी ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, उध्दव महाराज मंडलिक, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा बॅकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे , मांचीहिल शिक्षण संकुलाचे संस्थापक शाळीग्राम होडगर , गणपतराव सांगळे , भारतराव गीते , राजेंद्र पिपाडा, प्रमोद रहाणे , संदिपराव इलग , मनोज इलग , शिवाजीराव इलग आदींसह आश्वी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, कै. निवृत्ती पाटील इलग यांनी रचलेला विचारांचा पाया इतका मजबूत आहे की, त्याला कोणीही हालवू शकणार नाही. त्यांच्याबरोबर कै बाळासाहेब विखे पाटीलसह विखे पाटील कुटुंबाचा ३० वर्ष स्नेह संबंध होता. ते अतिशय परखड व स्पष्ट वक्ते होते. विखे पाटील कुटुंबावर त्याचे निस्वार्थ प्रेम असल्यामुळेचं आजारी असतानाही मला या कार्यक्रमाला यावे लागले. असे सांगताना कै. निवृत्ती पाटील इलग यांना श्रद्धांजली वाहून त्यानी इलग कुटुंबाने वैकुंठ रथ दान दिल्याबद्दल कौतुक करत शासनाच्या माध्यमातून यापुढे भजनी मंडळाकरिता लागणार्‍ या साहित्याकरिता योजना आणवी लागेल .
यावेळी ना. विखे पाटील यांच्या हस्ते दाढ येथिल शाळेला ११ हजारांची देणगी व भजणी मंडळला साहित्याचे वाटप करण्यात आले.
चौकट
 यावेळी परमार्थ व कुटुंब वात्सल्याचा बोध देत  रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी अमृततुल्य किर्तणातून उपस्थिताना आई – वडिलांचे महत्व पटवून दिले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed