जाखुरीत गगनगिरी महाराज अखंड हरि नाम सप्ताह शिवपुराण कथेत माधवदास महाराज राठी यांनी केला भक्तांना उपदेश
संगमनेर । झुंजार न्यूज
भगवान शिवशंकराचे वासतव्य काही मोजक्याच ठिकाणी आहे असे नाही तर जगात कुठेही जा तिथे भगवान शंकराचे वास्तव्य आहे भगवान परमार्थाला कुठ लीच मर्यादा नाही त्याला फक्त कालाची मर्यादा आहे सारखा त्यामुळे भगवान पर मार्थाची प्राप्ती करायची असतील तरशिव भक्तांनी भगवंताचे नामस्मरण हरिनाम कीर्तनातून श्रवण मनन करून केले तरच खऱ्या अर्थाने भगवान परमार्थाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असाउपदेश नाशिकचे शिवपुराण कथाकार माधवदास महाराज राठी यांनी शिवपुराण कथेच्या दुसऱ्या पुष्पातून केला
संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह शिवपुराण कथेचे दुसरे पुष्प गुंफ ताना माधवदास महाराज राठी बोलत होते यावेळी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे संजय महाराज देशमुख बाळू महाराज दीपक महाराज देशमुख वसंतराव देशमुख आबासाहेब थोरात कपिल पवार रमेश गुंजाळ अण्णासाहेब राहींज काशिनाथ पावशे अशोक कानवडे दादासाहेब वर्पे अशोक कोकणे सुजित वाकळे सागर वाकचौरे काकासाहेब देश मुख बाळा साहेब देशमुख किसन पानसरे राजेंद्र देशमुख राजेंद्र पान सरे नितीन पानसरे कारभारी राहणे विजय पानसरे आदीसह उपस्थित होते
की भगवान ब्रह्मदेव त्यांच्याकडे आपण जाऊ समाधान करतील असा विचार करून सर्व सत्य प्रार्थना केली या विश्वाची पालन पोषण करण्याचीआणि निर्मितीची जबाबदारी भगवंताकडे आहे अंकुरातून बीज आणि बीजातुन अंकुर ज्याप्रमाणे निर्माण होतो त्याप्रमाणे भगवान शिवांची भक्ती आणि त्यांची कृपा या परस्पर संल ग्न आहे त्यांची कृपा झाली की भक्ती निर्माण होते आणि त्यांच्याविषयी भक्ती निर्माण झाली की त्यांची कृपा प्राप्त होते जीवनामध्ये असाद्य आणि अप्राप्ती असं काही राहणार नाही कोणत्या साधनाचा कसा आणि कोणत्या कारणाकरता अव लंब करायचा हे तुम्हाला त्यातून कळेल तुम्हाला अधिकच शिवमहिमा जर अधिक जानून घ्यायचा असेल तर भूलोकावर जा आणि पृथ्वीवर यज्ञ करा तुम्हाला आपो आप भगवान शिव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी त्यांची मनोभावे पूजाआर्चा करा असे आवाहन त्यांनी शिव भक्तांना करून ते म्हणाली की भग वान शिवाकडे कर्मफलाविषयी अजिबात अपेक्षा करू नका निष्काम भक्ती करत रहा तुम्हाला त्याची फळ मिळाल्याशिवाय राहणार नाहीआणि त्या निष्काम भक्तीतून तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल असे त्यांनी सांगितले
भगवंताचे पूजन नामसंकीर्तनातून मनन करून भगवंताचे दर्शन करीत त्याचे पूजन करा आणि त्यातून तुम्हाला भगवंता ताची कृपा प्राप्ती नक्कीच होईल गंगा यमुना सरस्वती या नद्यांचे स्मरण करीत त्यातील पाणी अंगावर घेत स्नान करून वस्त्र बदलली कपाळी गंध लावला तुळ शीला पाणी घातले आणि देवा समोर उभे राहून नमस्कार करत पूजन करून देवाचा स्तुती पाठ केला आणि देवा बरोबरच आप ल्या आई-वडिलांना नमस्कार केला तरी देव तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही केला असे त्यांनी सांगितले संपूर्ण परिवाराच्या स्थिरतेला कारण वृत्ती नसेल तर संपूर्ण परिवार हा सुखी समाधानी आणि स्थिरस्थित आहे कुल देवतेची आणि आमच्या पितरांची जी आवश्यक उपासना ती होत नाही आणि जोपर्यंत या दोघांची कृपा होत नाही तो पर्यंत कुलवृद्धी होत नाही संतती व्हावी कुलवृत्ति व्हावी सुबत्ता यावी निश्चिंतता यावी अनुकूलता यावी असं वाटत असेल तर हेसर्व करणं आवश्यकच आहे पोटाची भूक भागवन्यासाठी माणूस बेभान होत असतो त्याला जे मिळेल ते तो खातच असतोआणि त्याच्या तो पोटाची भूक भागवत असतो जिभेवर आणि आपल्या इंद्रियावर नियंत्रण मिळू शकतो तोचखर्या अर्थाने कामना आणि वासनेला जिंकतो तोच स्थिर राहील पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय अकरा आणि मन या ज्ञानेन्द्रिय पंचक इंद्रिया चा विचार करा की ज्याचे आपल्या जिभेवर व आहारावर नियंत्रण नसेल तर चार चौघात उठायला लावते त्यामुळे जिभेला ताब्यात ठेवणे खूप कठीण आहे कलियुगात जो जीभेला जिंकू शकतो तोच खऱ्या अर्थाने नामस कीर्तन करू शकतो मध्यानाची व एक मध्यरात्रीची वेळ असते भुकेसाठी माणूस वेळ काळ पाहत नाही तो चोरी करण्यास मागे पुढे कधीच पाहत नाही भगवंताचे पूजन जप होम करून सत्कर्म केले तरच त्याचे फळ त्याभक्ताला मिळतच असते भगवान शिव हे निमित्त आहे आमच्या अंतकरणातला भाव सम र्पित करण्या साठी नित्यनेमाने भगवंताची पूजा करणे गरजेचे आहे
आज आमच्या मंदिरांमध्ये जेवढी अस्वच्छता आहे तेवढी इतर कुठल्याही प्रार्थना स्थळांवर इतर धर्मीयांमध्ये दिसत नाही आपल्या गावातली मंदिरांचा परिसर स्वच्छ असतो ज्या मंदिरातल्या देवतेची नित्य नियमाने पूजा आणि नित्य नैवेद्य आरती होत नाहीत त्या गावातले लोक समाधानी आणि सुखी राहूच शकत नाही याउलट ज्या गावी हे सगळं व्यवस्थित आहे त्या गावांमध्ये तुम्हाला मंदिरात सुबदता, निरोगीताआणि समाधान दिसेल आणि आपापल्या कर्मामध्ये प्रत्येकाला निष्ठा रुची आहे आपण ज्याप्रमाणेदररोज आंघोळ करतो त्याचप्रमाणे देवाला सुद्धा आंघोळ घालावी तयातूनच शिवसेवा व ऐश्वर्य प्राप्त होतं जेवढे म्हणून भगवान शिवशंकराने आपल्या मस्तकाचा भोपळा केला आपल्या शरीरातल्या नाड्यांच्या तारा केल्या आणि तपश्चर्या केली त्या भगवंताला तुमच्याकडून त्यांना काहीच लागत नाही फक्त तुम्ही नित्यनियमाने मंदिरात जाऊन पूजा करावी आणि देवा समोर हात जोडून उभे राहिले तर तुम्हाला ते प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही एवढी भक्ती देव आपल्या भक्तावर करत असतो तुम्ही देवाला काय दिले हे देव कधीच पाहत नसतो तो केवळ प्रेम आणि प्रेमच तुम्हाला देत असतो
गंगामाई त्यांच्या अंगावरून वाहते तुम्ही घातलेल्या स्नानाची गरज नाहीये आपला भाव आहे समर्पित करण्याची आवश्यकता आपल्यालात आहे आणि काहींची पूजा पाहिल्यानंतर आपण हे कशाला करतोय असा प्रश्न पडत असतो परमात्मा भगवान तिथे सगुण आहे सवि ग्रह आहे साकार आहे आणि सप्राण आहे ही भावनाच आपल्यात राहिलेली नाही राहिली नाही एवढा कंचेसपणाआपल्यात आहे
शिवनामाचा जप केला तर भगवान शिव प्रसन्न होतो ओंकार आणि ओमकार यात फरक आहे इतरांकडून करून घेतलेला नामजप आणि आपण केलेला नामजप वेगळा आहे आयुष्यात शिवतीर्थ यात्रा करावी शिवलयातील परिसरात स्वछता करावी फुलांचा शृंगार भगवान शिवाला प्रिय आहे त्यामुळे फुले व्हावी भगवान शिवाला फक्त नमस्कार करावा आणि त्यातून देव प्रसन्न होतो देवाला काही द्याचे असेल तर ते समर्पित भावनेने द्या नाही तर देवाला नाही दिले तरी चालेल
आयुष्याच्या प्रत्येक काळात भगवान शिवाचे पूजन करा आपल्या गावची नदी सुद्धा गंगा समान आहे त्यामुळे तिच्या पाण्याने पूजा केली तरी चालेल जो पर्यंत चालता येते तो पर्यंत तीर्थ यात्रा करा तीर्थ यात्रा केल्याने आयुष्यात केलेले पाप नष्ट होते आणि तीर्थस्थळाच्या ठिकाणी स्नान केले तर तुमचे पाप धुऊन जाते आणि देवाचे नामसमरण करा देव प्रसन्न झाल्या शिवाय राहणार नाही प्रत्येकाचे नित्यनिय माने सूर्योदयाच्या अगोदर आपलं स्नान झालेलं पाहिजे जर तुम्ही सूर्योदयाच्या अगोदर स्नान केले तर तुमच्या शरीरातील शारीरिक आणि मानसिक ९०टक्के रोग दूर झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे प्रत्येकाने सूर्योदयाच्या अगोदरच स्नान करावे आणि देवासमोर बसून नामस्मरण करावे असा सल्ला त्यांनी दिला
मृत्यू येण्याअगोदर काळ येतो आणि तो आपल्याला सूचना देत असतो परंतु त्याने दिलेल्या सूचना आम्हाला कळत नसतात त्यामुळे काळाला कधी घाबरू नका त्याच्याशी सामना करा आणि नित्य स्मरण करीत भगवंताचे नामस्मरण करा तुमच्यात अजिबात भय राहणार नाही राहणार नाही निर्भयकता प्राप्त करण्या साठी सकाळी लवकर उठावे सर्व तीर्थात सर्वश्रेष्ठ आपले आईवडील आहे त्यामुळे त्यांच्या पायावरील तीर्थ घेऊन केलेले स्नान सर्वात श्रेष्ठ आहे घरातील वआपले काम करताना देवाचे चिंतन करा अग्नी व सूर्य नारायणाचे नित्यनेमाने पूजन करावे रविवारी सूर्याची सोमवारी चंद्राची मंगळ वारी मंगळाची बुधवारी बुधाची गुरुवारी गुरुची शुक्रवारी शुक्राचीआणि शनिवारी शनाची उपासना करावी तुमच्या जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही जसे जो आपल्या मायबापाची सेवाकरतो त्याला मायबाप प्रसन्न असतात तसे जो यशवपर्वतींची सेवा करतो भगवान शिव अशा उपासकाला आपला आंतरिक ऐश्वर्य प्रदान करतो त्या ज्यांना आपल्या संसारातून सुटका करावी असे वाटत असेल तर त्याने शिवपूजन करावे त्याची नक्कीच संसरातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही असा उपदेश त्यांनी शेवटी शिवभक्तांना केला
चौकट
शिव मंदिरात अर्धीच प्रदक्षिणा घालावी : राठी
प्रत्येक शिव मंदिरात भक्तांनी देवाचे नामस्मरण करून प्रदिक्षणा करावी आणि ही प्रदक्षिणा घालताना काही भक्त पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालतात परंतु शिव मंदिराला प्रदक्षिणा घालताना कधीच पूर्ण प्रदक्षिणा घालू नये शिव मंदिराला नेहमी अर्धीच प्रदिक्षणा घालावी आणि तिथूनच मागे फिरावे असा सल्ला शिवपुराण कथाकार माधवदास महाराज राठी यांनी शिवभक्तांना दिला
