संगमनेर । झुंजार न्यूज

आश्वी व परिसरात वाढत्या अवैदय धंन्दयामुळे तरुणांमध्ये मारामाऱ्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये अवैध धंद्याचा येथे वाढता आलेख वाढल्याने गुन्हेगारी फोफावली त्यातूनचं दोन दिवसापुर्वी झालेल्या वादातुन ९ जणावर गुन्हे दाखल झाले आहे. भविष्यात अशी वाद होवू नये म्हणून पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
आश्वी पोलीस ठाण्याच्या परिसरात बेकायदेशीर पद्धती अनेक धंन्दे निर्माण होवून तरुणाई गुन्हेगारांच्या विळख्यात सापडत आहे . भविष्य शोधणारे तरुण अचानक दिसणार्‍या पैशाच्या मोहाला बळी पडत असताना कधी कधी तेल गेले तुप गेले हाती धुपाटने आले अशी वेळ येते . अशा परिस्थिती तरुणाई सैरावैर होत असल्याने त्याच्या हातून गुन्हे होण्याची शक्यता निर्माण होते . यावर पोलिसांनी त्वरीत लक्ष्य देवून मानवी समाज्याला कलंक लागणार्‍या अवैदय धंन्दे मुळापासून उपटून फेकावे म्हणजे गुन्हेगारी आळा बसेल अशी परिसरातील लोकांमध्ये चर्चा होत आहे 
मध्यतंरी आश्वी व परिसरातील अवैदय धंन्देयाच्या विरोधात रिपब्लिकन पक्ष व एकलव्य संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढला गेला होता मात्र त्यानंतर कुठल्या प्रकारे कारवाई झाल्याचे दिसून आले नाही मात्र दारु , मटका दुकान वाढताना दिसत आहे . चहाच्या टपरीप्रमाणे देशी दारुचे दुकान दिसू लागले आहे त्यामुळे मिळणार्‍या मायावी पैश्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे . तसेच गुटखा , गांजाचे प्रस्थ वाढले असून, गावागावातून तरुणाई गांजांच्या विळख्यात सापडलेली आहे. व्हिडिओ गेममध्ये पैसे हरल्यानंतर दररोज तंटे वाढले असून, अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.येथील तरुणाई कर्जाच्या खाईत लुटून बऱ्याच जणांचे जीवन बरबाद झाले आहे. यावर पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने पोलीस करतात तरी काय असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत आहे.
 छोट्या मोठ्या मारामाऱ्या,गुंडगिरी,महिलांची छेडछाड , मुलीना फुस लावून पळवून घेवून जाणे नित्याची बनली आहे. पोलिसांचे होणारे दुर्लक्ष गुन्हेगारीला आणखीनच बळ मिळत आहे. तर नुकतेच अवैदय धंन्दयामुळे दोन गटात हाणामारी झाल्याने यांचे लोण घरांच्या महिलांनाही भोगावे लागले आहे झालेल्या वादात तलवार , कोयता , लोखंडी गज , काठ्याचा वापर झाल्याने गुन्हा रजि व कलमनुसार १९७ / २०२३ भादवि प्रमाणे ३०७ , ४५२ , ३२४ , ३२३ १४३ , १४७ , १४८ , १४९ , ५०५ , ५०६ हे कलम नोंदवून  ९ जणावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस स्टेशनमधुन मिळाली आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *