संगमनेर । झुंजार न्यूज

रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ११.०० वा. तालुक्यातील मिरपूर येथे महाराष्ट्र राज्य आदिवासी संग्राम परिषदेमार्फत लोकपंचायत मेळावा ( गायरान , पाटवाडी )आदिवासी, भिल्ल ,ठाकर ,महादेव कोळी या  आदिवासी बांधवांनच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत विचार विनिमय करण्यासाठी लोक पंचायत मेळावा आयोजित केला असल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष दशरथ गायकवाड व आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात यांनी दिली आहे.

 

आदिवासींचे केले जाणारे शोषण, आदिवासी बांधवांवर केले जाणारे खोटे नाटे आरोप त्यांच्यावर होणाऱ्या केसेस, वन हक्क कायदे व त्याचे आदिवासी बांधवांस आलेले लाभ व वन हक्क कायद्यातील त्रुटी, माननीय राष्ट्रपती यांनी 29 डिसेंबर 2006 राष्ट्रपतीची अनुसूचित जमाती अपारंपारिक जंगलवासी (वन) अधिकार मान्यता अधिनियम 2006 ची मंजुरीबाबत चर्चा तसेच डोंगरदऱ्यात राहणाऱ्या, गायरान गावठाण मध्य राहणाऱ्या बांधवांना जल, जमीन, जंगल याचे रक्षण करणाऱ्या आदिवासी मूळ मालकांना जमीन मिळावी यासाठी शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी सर्व भिल्ल, ठाकर, महादेव कोळी , आदिवासी बांधवांनी संघटित होऊन मोठ्या प्रमाणात लोक पंचायत मेळाव्यास उपस्थित राहून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय योगदान द्यावी असे कळकळीचे आवाहन दशरथ त्रिंबक गायकवाड व आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात यांनी केले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed