आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे श्रावणी महीन्यातील अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होवून मोठ्या उत्साहाने सहा दिवसापासून किर्तन , भजन , काकड आरतीसह महाप्रसादाचा ग्रामस्थांसह परिसरातील भक्तगंण लाभ घेताना दिसत आहे .


यावेळी गावातील कार्यकर्त्यानी अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन करण्यात येवून सोमवार दि २१ रोजी सप्ताहास सुरुवात करण्यात आली वाड्या – वस्त्यासह संपूर्ण गावा वेगवेगळे ग्रुप तयार करत दररोज अन्नदान होत असून पहिल्या दिवसापासून स्वयंस्फुर्तीने लोकांच्या सहभाग दिसून आल्याने संपूर्ण सप्ताहा कालखंडात लोकांची सामाजिकवृत्ती दिसून येत आहे .  

दिवसभर ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आयोजित केला आहे. दैनंदिन कार्यक्रमात काकडा भजन, श्रींची महापूजा, ज्ञानेश्वरी पारायण, नेमाचे भजन, हरिपाठ तसेच सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नामदेव महाराज प-हाड (पहिला दिवस ) , आत्माराम महाराज टेकाळे ( दुसरा ) , उत्तम महाराज बडे ( तिसरा ) , नवनाथ महाराज गीते ( चौथा ) , अशोक महाराज बर्डे ( पाचवा ) , अर्जुन महाराज चौधरी ( सहावा ) यांची किर्तन झाली आज सातवा दिवस असून ह भ प  बाळा महाराज जाधव यांचे किर्तन होणार असून एकादशी असल्याने आजच्या अन्नदात्याकडून खिचडीचा बेत आहे .तर रविवार ९ वाजता गोकुळनंद महाराज पवार यांचे मृदुंगविशारद हा कार्यक्रम होईल तर सोमवारी सकाळी ११ वाजता सप्ताहाच्या समाप्ती काल्याचे किर्तन ह भ प दत्तगिरी महाराज यांचे होणार आहे .


 
यावेळी पहिल्या दिवशी प-हाड महाराज म्हणाले की , विठ्ठल नावात  मोठी शक्ती असून सर्वदूर त्या नावाचा जय जयकार होतो . मणुष्य जन्म हा एकदाचं असतो त्यां जन्माचा सार्थक केला पाहिजेल तर विठ्ठल , कृष्ण , पांडूरंग हे एक देव असून सप्ताहाच्या माध्यमातून नाम स्मरणाचा जयजयकार करा तर टेकाडे महाराज , बडे महाराज , गीते महाराज , बर्डे महाराज व चौधरी महाराज यांनी विविध रामायण , महाभारत मधील दंतकथा सांगून माता – पिता यांचा आदर करुन देवांचे नामस्मरण करायचे सांगितले .
  
यावेळी सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून सहाव्या दिवसा पर्यंत अन्नदात्यांनी सुंदर व उत्कृष्ट पद्धतीने  महाप्रसादाचे आयोजन केले. या प्रसादाचा मोठ्या उत्साहाने परिसरातील भक्तांनी , ग्रामस्थानी लाभ घेतला . आज एकादंशी असल्याने अन्नदात्यांनी खिचडी प्रसादाचे आयोजन केले असून आज व उदया समाप्तीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थांसह परिसरातील भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले ‘
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed