संगमनेर । झुंजार न्यूज
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा बरोबर अमृतवाहिनी मॉडेल स्कूलने गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने मोठे यश मिळवले असून नुकतेच शालेय स्तरावरील हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक मिळवत या विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य श्रीमती शीतल गायकवाड यांनी दिली आहे.
क्रीडा स्पर्धेबाबत माहिती देताना शितल गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते मा. शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. गुणवत्ते बरोबरच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहेत. नुकत्याच क्रीडा व युवक सेवा संचालनालाय पुणे अंतर्गत अहमदनगर जिल्हा व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने मंगळापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेत अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील 17 वर्ष वयोगटाच्या मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळून यश संपादन केले आहे .या संघांमध्ये सोनाली चौरे, योगेश्वरी भोये ,दर्शना गायकवाड, निशा पवार ,जागृती सातपुते, गायत्री राऊतमळे, चारुशीला महाले, हर्षदा देशमुख, निशिता भारसाट, जयश्री धूम, ऋतुजा चौधरी ,वैदही चौधरी या मुलींनी सहभाग घेतला .
तसेच 17 वर्षे वयोगटात मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला त्यामध्ये रुपेश बागुल ,उमेश चौधरी, नितीन गावित, विकास चौधरी ,सौरभ गावित, राकेश चव्हाण, शेखर गावित, रोशन गांगुर्डे, मनीष शहारे ,विजय साबळे ,प्रतीक भोई, वैभव ठाकरे, या मुलांनी सहभाग घेतला.
वय वर्ष 19 वयोगटात द्वितीय क्रमांक मिळून भरगोस हे संपादन केले या संघामध्ये कुणाल नागरे, उद्धव चौधरी, मयुरी भुसार, मयूर चव्हाण, सुमित गावित, प्रतिक भोये, वैभव ठाकरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सतरा वर्ष वयोगटातील मुलांची संघाची निवड जिल्हा स्तरीती स्पर्धेसाठी झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक हेमंत पंदारे ,रवींद्र कदम, वैष्णवी जाधव ,राजेंद्र अंकम यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांचे विधिमंडळ पक्षनेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ.सुधीर तांबे ,उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील गुंजाळ, संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्राचार्य प्रा विवेक धुमाळ ,प्राचार्य शितल गायकवाड, सर्व विभाग प्रमुख, यांनी अभिनंदन केले आहे
