संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्याती पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विदयालयात घेण्यात आलेल्या एम के सी एल ( MKCL ) या परिक्षेमधून विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळविले .
सरदार थोरात विदयालयाचे मुख्याध्यापक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व आर एफ क कॅम्पुटर संस्थेचे संचालक सागर भडकवाड , सौ सुजाता भडकवाड प्रथमेश जाधव , प्रतिक मुन्तोडे व थोरात  विदयालयाचे कर्मचारी लहानू साबळे यांच्या प्रयत्नाने ६७ विदयार्थ्यानी MKCL परिक्षा दिली यात सर्व विदयार्थ्यानी घवघवीत यश मिळविले यात कु साक्षी सुखदेव फणसे , कु निकिता गोविंद सानप यांचा प्रथम क्रमांक आला तर द्वित्तिय क्रमाकात कु वैष्णवी भारत शेवाळे , कु तनुजा दत्तात्रय चव्हाण व तृतीय क्रमाकात कु गायत्री अशांबापू हजारे , कु अनुजा अशोक बर्डे , कु सारिका भाऊसाहेब ढोणे आल्या 
विशेष म्हणजे प्रथम ते तृतीय क्रमाक हे मुलीनीचं पटकविले . यशस्वी विदयार्थ्याचे शिक्षक , पालक यांनी अभिनंदन केले . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *