श्रीरामपूर । झुंजार न्यूज

 

श्रीरामपुर तालुक्यातील हरेगाव मध्ये कबुतरे चोरल्याच्या संशयावरुन दलित मुलांना झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण करणे निंदणीय असून ही घटना अत्यंत निर्घृण आणि माणूसकिला काळीमा फासणारी असल्याची तिखट प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली . 

 

  हरेगांव घटनेची दखल घेऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी १ सप्टेबर २०२३ रोजी दुपारी श्रीरामपुर मधील साखरकामगार रुग्णालयात जाऊन तेथे उपचार घेत असलेल्या हरेगाव मधील पिडीत मुलांची भेट घेतली.त्यांचे सांत्वान करुन त्यांना धिर दिला. त्यानंतर ना.रामदास आठवले यांनी हरेगावला सुद्धा भेट देवून तेथील लोकांना आधार देत मी व माझा पक्ष तथा सरकार तुमच्या पाठीशी असून पोलिसांनी पीडितीच्या नातेवाईकांना ताबडतोब संरक्षण दयावे असे फरर्मान सोडले .

 पीडीत मुलांमध्ये एक मुलगा मराठा समाजाचा आहे. गावगुंडांच्या त्रासाला सर्वच जाती धर्माच्या लोकांना बळी पडावे लागत आहे. झालेल्या प्रकाराचा रिपब्लिकन पक्षा तर्फे तिव्र निषेध करण्यात आला असून या प्रकरणी रिपब्लिकन पक्षाने सुरुवाती पासून पिडीत मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून प्रमूख आरोपी नाना गलांडे हा फरार आहे.या आरेपीला त्वारित अटक करुन कठोरात कठोर शिक्षा करावी अशी तिव्र भावना पिडीत मुलांच्या कुटुंबियांनी ना.रामदास आठवले यांच्या कडे व्यक्त केली.

हरेगाव प्रकरणातील आरोपींवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करुन खटला जलद गती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच फिर्यादीला पोलीस संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण भेट घेणार आहोत तसेच या प्रकरणातील पिडीत मुलांना मुख्यमंत्री सहायता निधीतुन प्रत्येकी किमान एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण भेट घेणार असे ना.रामदास आठवले या वेळी म्हणाले.या प्रकरणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने गावाला भेट देऊन योग्य कारवाई केली. असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.

 
रिपब्लिकन पक्षा तर्फे पिडीत मुलांना प्रत्येकी दहा हजारांची अर्थिक मदत करण्यात आली.पिडीत मुलांच्या कुटुंबाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर उभा आहे. अशी ग्वाही ना.रामदास आठवले यांनी या वेळी दिली.

 
या प्रसंगी रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , दिपकराव गायकवाड , उत्तर महाराष्ट अध्यक्ष प्रकाश लोंढे , दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , राजाभाऊ कापसे , बाळासाहेब गायकवाड , भिमा बागूल , सुभाष त्रिभुवन , आशिष शेळके , पप्पू बनसोडे , प्रविण बनसोडे , रमेश गायकवाड , जनार्धन साळवे , कैलास शेजवळ , सिमाताई बोरुडे , वैशाली सोनवणे , रमाताई धिवर , वंदना म्हसे , स्नेहल दिवे सिमा तुपे  अंजना सोनवणे , 

मनालीताई जाधव आदि अन्य मान्यवर उपस्थित होते 
चौकट
हरेगांवातील घडलेली घटना ही पहिल्यांदाच घडलेली असून ही घटना कोणत्याही जाती विरोधातली नसून अफाट संपत्तीच्या मुजुरीवरील घटना आहे गोरगरिबांना अशा प्रकारे त्रास देणार्‍याला गांवाकऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी तर फरार असणाऱ्या आरोपीला तातडीने अटक करुन कारवाई करावी . मी येथे कोणत्या समाज्याच्या विरोधात नसून गांवगुंडपणा करणाऱ्यांच्या विरोधात आलो तर मराठा समाज्यासह सर्व जाती व्यवस्थेच्या लोकांना न्याय हक्क व अधिकार मिळण्याकरिता मी प्रयत्न करत आहे 
रामदास आठवले ( केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री , भारत सरकार )
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed