संगमनेर । झुंजार न्यूज

इंडिया आघाडी ही नरेंद्र मोदी यांना हटवण्याची आघाडी- मात्र कितीही लोक इंडिया आले तरी २०२४ ला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीचं केंद्रात पुन्हा सत्ता येणार असल्याचा विश्वास पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला . 

 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज संगमनेर तालुका दौऱ्यावर होते.श्रीरामपुर तालुक्यातील हरेगाव येथे मागासवर्गीय मुलांवर झालेल्या अत्याच्याराबाबत त्यांनी संगमनेर येथील कार्यकर्त्यांशी चर्चा केली.यावेळेस केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. चोरी केली म्हणून कुठल्याही समाजातील मुलांना झाडावर उलटे टांगून मारणे हा मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे

 

तर मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक चालू आहे या इंडिया आघाडीतील सर्वजण घंमडी व्यक्ति भरलेले असुन त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी नरेंद्र मोदींना ते हटू शकत नाही इंडिया आघाडीही नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी तयार झाली आहे.पण त्यांची योजना सफल होणार नाही येणाऱ्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला ३५० जागा मिळतील भारतीय घटनेने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे.प्रकाश आंबेडकर यांनी जो काही केंद्र सरकार विरुद्ध राहुरी मध्ये जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे हा मोर्चा काढण्याचे अधिकार दिले असल्यामुळे ते मोर्चा काढू शकतात असेही यावेळेस केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. .

चौकट

नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली राज्यात ४८ पैकी ४२ जागा भाजपा व मित्रपक्षच्या निवडून येतील व माझी शिर्डी लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा आहे मात्र वरिष्ठ पातळीवर यांचा निर्णय होईल तर २००९ मध्ये माझा पराभव राजकिय प्रवृत्ती व्यक्तीने केला नसून अॅट्रोसिटीचा गैरप्रचारामुळे झाला . तर पुन्हा निवडणुक लढविण्याची संधी मिळाल्यास माझी लढाई ही विकासात्मक कामे करिता असेल 

रामदास आठवले ( केंद्रीय मंत्री ) 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed