संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सांगळे वस्तीवर असणाऱ्या कृष्ण मंदिरात बालपन इग्लीश स्कूलच्या बाळगोपाळांनी पारंपारिक वेशभूषातून गोपाळा – गोपाळा म्हणत गोकूळअष्टमी साजरी केली .

यावेळी सुदाम सांगळे , प्रियंका शिंदे , पल्लवी भूसाळ , सविता खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्यांना श्रीकृष्ण – राधिकासह बाळगोपिकांची वेशभूषा बालपनच्या चिमुकल्यांनी करत एक आनंदीमय वातावरणात मुलांच्या चेहर्यावर उत्साह दिसून आला .गोपाळा – गोपाळा गाण म्हणत श्रीकृष्ण मंदिरात उभारलेली दहीहंडी फोडून चिमूकल्यांनी गोकूळाष्टमी साजरी केली .

यावेळी सुदाम सांगळे यांनी श्रीकृष्णांची कथा सांगत मुलांना खाऊचे वाटप केले .
