संगमनेर । झुंजार न्यूज

अंभोरे गावांतील जागृत असणारे काळूबाईचे मंदिर अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ग्रामस्थांच्या पुढाकारातून पुर्णत्वास आले असून गावांत आता आध्यात्मिक मंदिर पूर्ण झाल्याने त्यांचे पावित्र्य जपणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे आवाहन माजी महसूल मंत्री आ बाळासाहेब थोरात यांनी केले .
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील दिर्घकालिन असलेले ग्रामदैवत काळुबाई मंदीराकरिता माजी म महसूलमंत्री आ . बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व महानंदाचे माजी अध्यक्ष तथा संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख साहेब यांच्या प्रयत्नाने भरघोष निधी देवून मंदिर पुर्णत्वास नेले तसेच गावच्या सर्वागींण विकासासाठी स्थानिक संस्था इमारत,समाज मंदीर,रस्ते,विद्यालयासाठी शाळा खोली,व्यायाम शाळा,मंदीर सभा मंडप,सभागृहासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने गावचा विकासाची घोडदौड सुरु आहे . 
महाराष्ट्रातील साडे तिन शक्ती पिठा पैकी एक शक्तीपिठ म्हणजे काळूबाई देवी होय या देवीचे मंदीर नव्हते .ते आज ग्रामस्थांच्या आर्थीक सहकार्यामुळे  पूर्णत्वास गेले आहे. त्यामूळे हजारो भाविकांचे चेहऱ्यावर आनंद दिसू लागला काळुबाई मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश पूजन सोहळा कार्यक्रम बालब्रम्हचारी परमहंस मुक्तांनंद गिरी महाराज यांचे शुभहस्ते व वेदशास्र पुरोहित प्रसाद जोशी यांचे मंत्रोपचारात होम हवन,पुजा पाठ,विधि करण्यात आला.
यावेळी आमदार थोरात म्हणाले की अंभोरे गावांशी  मी सदैव पाठीशी असून गावच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. दिलेल्या निधीचा वापर तुम्ही योग्यरितीने करत असल्याने मलाही खुप समाधान वाटते .निळवंडेसाठी मी माझ्या कार्यकाळात खुप निधी आणला म्हणून ते आज पुर्ण झाले आहे . आता फक्त कालव्याची कामे बाकी आहे ती कामे सुध्दा येणा-या काळात लवकरच मार्गी लावू आता सर्वांना निळवंडे कालव्यातून पाणी मिळेल त्यामूळे शेतीसाठी त्या पाण्याचा उपयोग होईल.
 यावेळी प्रास्ताविकातून रणजितसिंह देशमुख म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्या व्यापक दुरदृष्टीतून अंभोरे गावचा चेहरा मोहरा बदललेला आहे.त्यांनी आजपर्यंत प्रचंड प्रमाणात निधी दिला . अंभोर्‍यातील काळूबाई देवी जागृत स्थान आहे. आजपर्यत अनेक साथीचे आजार उद्भभवले मात्र गावांतील लोक सुरक्षित राहिले . कोरोना काळात संपुर्ण देशात,राज्यात कोरोना या आजाराने धुमाकूळ घातला असताना अंभोरे गांव सुरक्षित राहिले. केवळ काळुबाई देवींची शक्तीमुळेचं गावात कोणत्याही  प्रकारची जिवीत हानी झाली नाही. तर गावांतील विविध संस्था प्रगती पथावर असून बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून अनेक लोकभिमुख कामे होत आहे .
यावेळी ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी आपल्या हरिकीर्तनातून  साडेतीन पिठापैकी काळुबाई देवीचे एक शक्ती पिठ होय . ‘स्री’ची अवहेलना न करता आजच्या ‘स्री ‘ चा सन्मान करा जर ती बिघडली तर आपला कायमचा कार्यक्रम झाला असे  समजा गावांनी काळुबाई देवीचा सन्मान करुन सर्व महिलांचा सन्मान केला आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत आजची महिला,प्रत्येक माणुस हा स्वार्थी बनत चालला असुन भारतीय संस्कृतीचा -हास होत चालला आहे.संस्कृती टिकविने हे आज आपले सर्वांचे कर्तव्य व जबाबदारी आहे.समाजात विवाह निमंत्रण पत्रिका , वधू व वर यांचे फ्लेक्स गावोगावी लावत आहे.त्यातून फ्लेक्स वधू,वर यांचे  फोटो बघुन आपण आपले संस्कृतीचे अभद्र प्रदर्शन घडवुन बाजार मांडला आहे. मुलीचा आदर करा दुसऱ्यांच्या घरात आणलेल्या मुलीला आपल्या मुलिप्रमाने वागणूक द्या.मुलीचे जन्माचे स्वागत करा .
यावेळी माजी महसूल मंत्री आ बाळासाहेब थोरात ,संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख , ह भ प निवृत्ती महाराज इंदोरीकर ,परमहंस बाल ब्रम्हचारी ह.भ.प.मुक्तांनंद गिरी महाराज,जेष्ठ कार्यकर्ते रावसाहेब रावजी खेमनर , लहानु भिमाजी खेमनर , सहादु दामू खेमनर ,सोपान राधु खेमनर,माजी सरपंच भास्करराव खेमनर , आण्णासाहेब जगनर , चेअरमन रावजी भागा खेमनर , सरपंच सौ. सुरेखाताई भाऊसाहेब खेमनर , उपसरपंच किसनराव खेमनर , भाऊसाहेब रखमा खेमनर , भाऊसाहेब वाघमोड़े, विठोबा नामदेव खेमनर , बबन सुभा खेमनर , रमेशराव खेमनर , दत्तु पाटिल खेमनर  सोपान काशिनाथ खेमनर , महेश खेमनर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.एम.खेमनर सर , सुभाषराव हळ्नोर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंभोरे ग्रामस्थ , सर्व पदाधिकारी , रणजित दादा देशमुख मित्र मंडळाचे पदधिकारी , युवकांचे विशेष सहकार्य लाभले.अंभोरे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ , महिला ,युवक ,बालगोपाळसह हजारोंच्या संख्खेने उपस्थित होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *