संगमनेर । झुंजार न्यूज

 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचा विचार जन माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रभाग 1,3,4 व प्रभाग 11,12 व 14 मध्ये झालेल्या जनसंवाद यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

संगमनेर शहरात झालेल्या पद यात्रेत माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, मनोज पुंड, बाळासाहेब पवार, सौ.सुनंदाताई दिघे, मुन्ना कडलग, किशोर टोकसे, शाकिब बागवान, जीवन पंचारिया, सिद्राम दिद्दी, प्रवीण दीद्दी, सुभाष दिघे, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, गणेश गोडसे, गौरव डोंगरे, चंद्रकांत काळंग, अशोक जाधव, संजय पुंड, श्याम करपे, संजय पुरी, हरी भोसले, सचिन पाबळकर, सचिन सोनवणे, सतीश जाधव, सुनील ढेरे, प्रीतम जगताप, राजू पर्वत, जाकीर खान, भाऊराव रहाणे, भूषण कर्डक, जुबेद खान, राम भालेराव, सोनाली शिंदे, जयश्री पुंड, अनुजा पुंड, वसीम भाई, मुजीब खान, लाला मजर शेख, आवेश खान, शहबाज खान, आणिस शेख, बालमभाई, शोएब खान, शेख, बाबा भाई, आसिफ खान, रईस भाई, दिलावर पिंजारी आदींसह विविध पदाधिकारी सहभागी झाले.

यावेळी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, देशाची लोकशाही सध्या संकटात आली असून भारतीय संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. हा लढा लोकशाही जिवंत ठेवण्याचा आहे. त्यामध्ये मतभेद विसरून सर्वांनी एकत्र या. संगमनेर तालुक्यात लोक नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम होत असून आमदार थोरात हे पुरोगामी विचारांचे पाईक आहेत. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने नागरिकांनी लोकशाही व राज्यघटनेचा विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे असे आवाहन केले.

तर सोमेश्वर दिवटे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मध्ये भव्य पदयात्रा झाली असून यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. शहरातील प्रत्येक वार्डात दररोज सायंकाळी सहा वाजता पद यात्रा होणार असून यामध्ये शहरातील नागरिक युवक महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

या दोन्ही रॅलीमध्ये भारत जोडो, नफरत छोडो यांसह भारत माता की जय, हम सब एक है अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी ढोल ताशांच्या गजरात पद यात्रेचे स्वागत झाले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed