संगमनेर । झुंजार न्यूज

निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे गती कामे करुन तत्काळ उजण्या व डाव्या कालव्याना पाणी सोडावे म्हणून निळवंडे पाटपाणी कृती समिती आयोजित संगमनेर जलसंपदा कार्यालय घुलेवाडी या ठिकाणी बुधवार १३ सप्टेंबर २०२३ रोजी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी लाभधारी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जन आक्रोश मोर्चात सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे .
 गेल्या ५३ वर्षांपासून निळवंडे प्रकल्प रखडलेला दिसला अनेक आदोलन झाले अनेक वर्षांच्या संघर्षानंतर निळवंडे कालव्यांची चाचणी घेण्यात आली लोकांच्या दबावाने हे काम मार्गी लागत आहे . हे काम होताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या अनेक दशकानंतर ही निळवंडेचे पाणी येणारच नाही जी काही भावना इथल्या शेतकऱ्यांमध्ये झाली होती ती खोटी ठरवण्यासाठी ही चाचणी पुरेशी होती. निळवंडे धरणाचे पाणी येऊ शकते हे यातून सिद्ध झाले आहे. त्यात आता आपल्यावर दुष्काळाचे भीषण असे संकट ओढावले आहे. आपली पिके पावसा अभावी जळून खाक झालीच आहे, पण आपले पशुधन देखील धोक्यात आले आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तरी देखील आपण गप्प बसणार का ? “जायकवाडीला पाणी सोडणार”… “आपल्याला किती पाणी मिळणार’…. ? “अजूनही पाणी येईल का’… ? मला त्या पाण्याचा काय फायदा… ? “आपल्याला आंदोलनाने काय होणार’… ? असे बिनकामाचे प्रश्न मनात आणू नका. आपल्याला थेट फायदा जरी झाला नाही, तरी जो विकत चारा घ्यायचा आहे, तो तुलनेने मला स्वस्त मिळेल एवढा विचार करा…  आपण घरी बसल्यामुळे राजकारण्यांबरोबरच प्रशासनाचे भावत आले आहे.  आपला प्रपंच धोक्यात आला आहे. तरी पण आपण आपल्या नेत्याची काळजी करणार का? मी आंदोलनात सहभागी झाल्यावर माझी निष्ठा ज्या नेत्यावर आहे, त्या नेत्याला काय वाटेल ह्या पेक्षा माझ्या प्रपंचासाठी हे पाणी महत्त्वाचे आहे, याचा विचार करा आणि जागे व्हा…सर्व गट- तट बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी व्हा. पाणी फार मोठे आहे. आपल्या १८२ गावांचे पाझर तलाव चार वेळा भरून देखील पाणी शिल्लक राहिल एवढे मोठे हे पाणी आहे. फक्त हे पाणी सोडण्यासाठी गरज आहे ती आपल्या संघटीत ताकदीची…त्यामुळे या पवित्र कार्यात सहभागी होऊन आपल्या उन्नतीसाठी प्रयत्न करूया…
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या-
१) कालव्यांची गळती रोखून कालव्यांना तात्काळ पाणी सोडणे.
२) उजव्या कालव्याचे काम तात्काळ पूर्ण करणे.
३) ओढ्यांवर एस्कॅप काढून लाभक्षेत्रातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावे. 
४) निळवंडेचे पाणी भंडारदरा लाभक्षेत्रात सोडून नये, उन्हाळ्यात लाभक्षेत्रात पाणी राखीव ठेवावे.    
५)  चाऱ्यांच्या कामांचे जलसंपदा विभागाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल नाही, चाऱ्यांच्या कामांची तात्काळ निविदा काढणे. 
६) कालवा अस्तरीकरण एकाच ठेकेदाराला न देता अनेक ठेकेदारांना विभागून द्यावे, ज्यामुळे अस्तरीकरणाच्या कामाला गती येईल. 
तरी लाभार्थी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने होणार्‍या जन आक्रोश आदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *